राकेश टिकैत मुंबईत दाखल, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीला राहणार उपस्थित

शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikayat)  मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले आहेत. ते आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

राकेश टिकैत मुंबईत दाखल, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीला राहणार उपस्थित
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 8:23 AM

मुंबई: शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait)  मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले आहेत. ते आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक आहे. या बैठकीला ते संबोधित करणार आहेत. टिकैत यांच्याशी टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे. जोपर्यंत एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी टिकैत यांनी दिला. 

दुपारी किसान मोर्चाची बैठक

आज दुपारी बारा वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला टिकैत उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीमध्ये शेतकरी आंदोलनाची पुढील रणनिती ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीनंतर टिकैत हे आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या आस्थि कलशाचे मुंबईमध्ये विसर्जन करणार आहेत. कृषी कायदे मागे घेण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला एमएसपी लागू  करावी ही आमची प्रमुख मागणी होती. केंद्राने कृषी कायदे मागे घेतले आहेत, आता एमएसपी देखील लागू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच जोपर्यंत एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहाणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला देणार भेट 

राकेश टिकैत हे गेल्या पंधरा दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या  आंदोलनाला देखील भेट देणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच एसटी कामगारांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावावण्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या 

ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात, संजय राऊत यांची रोखठोक टीका

कडाक्याच्या थंडीतही हर्षवर्धन पाटलांचे आंदोलन सुरूच; शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक तास आधी विरोधी पक्षनेत्यांची बैठक, सरकारला घेरण्याची रणनीती ठरवणार

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.