AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही”, रामदास कदमांचे गंभीर आरोप

Uddhav Thackeray : रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही, रामदास कदमांचे गंभीर आरोप
ठाकरेंवर रामदास कदमांचे गंभीर आरोप
| Updated on: Jul 27, 2022 | 2:06 PM
Share

मुंबई : “उद्धव ठाकरे दुजाभाव करतात. मराठा नेत्यांना ते मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम (Ramdas Kadam) ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत”, असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी केले आहेत. आज रामदास कदम आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामदास कदम यांच्याशी टीव्ही 9 मराठीने खास संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. यावेळी मागची 3 वर्षे शिवसेनेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मला बोलू दिलं नाही. माझ्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेले निर्णय आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जाहीर केले, असे आरोप कदम यांनी केले आहेत.

“मराठा नेत्यांची गळचेपी”

“उद्धव ठाकरे दुजाभाव करतात. मराठा नेत्यांना ते मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत. गळचेपी केली जातेय”, असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी केले आहेत.

“शिवसेना पक्षप्रमुख नव्हे तर माजी मुख्यमंत्री”

आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिंदेगटातील आमदार शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न करता, माजी मुख्यमंत्री म्हणत शुभेच्छा देत आहेत. तुम्ही कश्या शुभेच्छा द्याल, असा प्रश्न रामदास कदम यांना विचारण्यात आला तेव्हा मी त्यांना माजी मुख्यमंत्रीच म्हणेन. मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण ते आज बाळासाहेबांचे सुपूत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारानुसार ते काम करत आहेत, त्यामुळे मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणू इच्छित नाही, असं रामदास कदम म्हणाले आहेत.

“उद्धवजी, आत्मपरिक्षण करा”

एवढे आमदार एकत्रितपणे पक्ष का सोडतात? एवढ्या खासदारांना आपण एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यावा, असा विचार का येतो? पक्ष फुटलाय. आतातरी उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करायला हवं, असं कदम म्हणाले आहेत. ता तुम्ही सगळ्यांना भेटताय. हे सगळं याआधी केलं असतं तर एवढी मोठी घटना घडली नससी, असंही ते म्हणालेत.

मुलाखतीवर टीका

आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. पण राऊतांनी ठाकरेंची घेतलेली मुलाखत उंदराला मांजर साक्ष अशी होती, अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.