AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : ‘महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था मांजरांच्या पिलांसारखी’, रावसाहेब दानवेंचा जोरदार टोला, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलीय. 'महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था मांजरांच्या पिलांसारखी झाली आहे', असा टोला दानवेंनी लगावलाय.

Raosaheb Danve : 'महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था मांजरांच्या पिलांसारखी', रावसाहेब दानवेंचा जोरदार टोला, मुख्यमंत्र्यांवर निशाणा
रावसाहेब दानवे यांची महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 8:34 PM
Share

औरंगाबाद : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) तोंडावर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणुकीत अधिक वेगवान घडामोडी घडत आहेत. आज महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच आता हे सर्व आमदार मतदानापर्यंत हॉटेलमध्येच मुक्कामी असणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलीय. ‘महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था मांजरांच्या पिलांसारखी झाली आहे’, असा टोला दानवेंनी लगावलाय.

रावसाहेब दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबादला होत आहे तो त्यांचा राजकीय विषय आहे. पण भाजपचे राज्यसभेसाठी जो तिसरा उमेदवार उभा केला आहे तो नक्की निवडून येईल याबाबत आमच्या मनात कुठलिही शंका नाही. त्यांनी कितीही मोर्चेबांधणी करु द्या. गेल्या दोन चार दिवसांत त्यांनी बोलावलेल्या बैठकीला अपक्ष आमदार उपस्थित नव्हते. अपक्षांच्या भरवश्यावर ते सत्तेत आहेत तर त्याच अपक्षांवर यांनी अविश्वास का दाखवावा? का त्यांना एका हॉटेलमध्ये बंदिस्त करुन ठेवलं? हॉटेलमध्ये बंद करुन जर ते मतं घेत असतील म्हणजे यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. यांनी आमदारांना मोकळं सोडलं पाहिजे. मग बघितलं पाहिजे की अपक्ष आमदारांचं सरकारबाबत काय मत आहे. त्यांना आमची भीती नाही तर हे अपक्ष आमदार आपल्याला कधीही सोडून जाऊ शकतात याची त्यांना भीती आहे, अशा शब्दात दानवेंनी मविआ सरकारची खिल्ली उडवली.

‘त्यांनी आमदारांना कोंडून ठेवलं तरी भाजपलाच मते मिळतील’

त्याचबरोबर ‘आमच्याकडे सर्वाधिक मतं आहेत. अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे, त्यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अपक्षांच्या मतांची गॅरंटी नाही. त्यांना मत कुठेही द्यायचा अधिकार आहे. त्यांनी कोंडून ठेवलं तरी भाजपलाच मते मिळतील. भाजपचे उमेदवार निवडून येतील. बैठकीचा काही फायदा होणार नाही. आज हॉटेल बदलले आहे. मांजर जसं पिल्लाला या घरातून त्या घरात नेत असते तशी हालत करून ठेवली आहे’, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर केलीय.

‘मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतील सभेवरुन टीका’

दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतील उद्याच्या सभेवरही टीका केलीय. ‘ज्या दिवशी ते सरकारमध्ये सामील झाले तेव्हा पासून लोक विचार आहेत, तुम्ही हे राज्य अडीच वर्षात राज्याला कुठे नेऊन ठेवलं. शेतकऱ्यांना मदत केली किती, आमच्या योजना बंद केल्या किती, तुमच्या किती योजनांची अंमलबजावणी केली आहे. हे लोक विचारत आहेत’, असं दानवे म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.