AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपतींसमोर सगळेच नतमस्तक, ‘आज के शिवाजी…’ वादावर ‘सामना’तून पडदा

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरुन काढू नयेत ही अपेक्षा 'सामना'तून व्यक्त करण्यात आली आहे.

छत्रपतींसमोर सगळेच नतमस्तक, 'आज के शिवाजी...' वादावर 'सामना'तून पडदा
| Updated on: Jan 15, 2020 | 8:20 AM
Share

मुंबई : शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी आणि शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, असा इशारा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पत्रकार परिषदेत शिवसेनेवर तोफ डागल्यानंतर सामनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र ‘वाद संपला! छत्रपतींसमोर सारेच नतमस्तक’ अशा मथळ्याखाली शिवसेनेनेच वादावर पडदा (Saamana on Aaj Ke Shivaji) घातला आहे.

‘शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि पेटून उठला. पंडित नेहरु असतील, नाहीतर मोरारजी देसाई, सगळ्यांनाच शिवरायांपुढे नतमस्तक व्हावे लागले. आताही तेच झाले. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरुन काढू नयेत ही अपेक्षा ‘सामना’तून व्यक्त करण्यात आली आहे.

फुटकळ लेखकाला भाजपमधून एव्हाना हाकलून का दिले नाही? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे. गोयल याला जे ओळखतात ते ठामपणे सांगू शकतात, की हा माणूस खोट्या प्रसिद्धीसाठी भुकेला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आता असे जाहीर केले आहे की जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू. अशा वक्तव्यांमुळे लोकांच्या भडकलेल्या भावना आणखी पेटतात. असं असेल तर भाजप कार्यालयात नरेंद्र मोदी हेच शिवाजी असे सांगणाऱ्या लेखकावर त्याच कायद्याने कारवाई का झाली नाही? कारण याच कारणामुळे राज्यातील वातावरण पेटलं आहे. ते प्रकरण भीमा कोरेगाव दंगलीसारखे होऊ नये हीच आमची अपेक्षा, असंही पुढे ‘सामना’त म्हटलं आहे.

‘सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार हे ‘जाणता राजा’ कसे? हा बाळबोध प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारावा. कारण शिवराय रयतेचे राजे होते. तर जनतेच्या प्रश्नांबाबत आणि भावनांबाबत खडान्-खडा माहिती असलेले पवार हे जाणते राजे असल्याचं नरेंद्र मोदींनीही मान्य केलं आहे.’ असं सामनात म्हटलं आहे.

उदयनराजेंचा हल्लाबोल

शिवसेना या नावाला कधी आम्ही हरकत घेतली नाही, पण आता शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, असं चॅलेंज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिलं आहे. दादरमधील शिवसेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वर का? असा सवालही उदयनराजेंनी केला होता.

Saamana on Aaj Ke Shivaji

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.