दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल

राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय.

दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
सदाभाऊ खोत, माजी मंत्री
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 3:26 PM

सोलापूर : ऊसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय. (Agitation in Solapur led by Sadabhau Khot on the issue of sugarcane FRP)

शरद पवार यांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मरगीचे अश्रू पुसण्याचे काम आहे. एकीकडे शतकऱ्यांना शेतमाल विकण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असा उल्लेख शरद पवारांच्या आत्मचरित्रात आहे. मात्र, करार शेतीचा पहिला प्रयोग 2005 मध्ये शरद पवार यांनी आणला. करार शेतीचा सगळ्यात जास्त फायदा बारामती अॅग्रोला झाला. तिथे उभारलेलं वैभव हे याच कायद्या अंतर्गत आहे. पोट भरल्यानंतर दुसऱ्यानं जेवण करु नये म्हणून ते कडू आहे असा सांगण्यासाखरा प्रकार आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी पवारांना लगावला आहे.

सहकार, साखर सम्राटांवर हल्लाबोल

आंदोलनापूर्वी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी विविध मुद्द्यांवरुन पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. शुगरकेन अॅक्टनुसार ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. मात्र निती आयोगाला तीन टप्प्यात पैसे देण्याची सूचना केली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. सहकार आणि साखर सम्राटांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माती करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप सदाभाऊंनी केलाय.

‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे सर्कस’

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक सर्कस आहे. या सर्कशीतले सगळेच विदूषक आहेत. सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे हे लोक महाराष्ट्रातील जनतेची खिल्ली उडवत आहेत. 2019 च्या जीआर नुसारच महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, अशी मागणी खोत यांनी केलीय.

‘दोषी असेल त्याल फासावर लटकवा’

लखीमपूर हिंसाचारावर बोलताना बळीराजा हा अन्नदाता आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर न्याय मागण्याचा त्याला अधिकारी आहे. सत्तेचा उन्मान कुणावला येत असेल, शेतकऱ्यांच्या रक्ताचा सडा कुणी पाडत असेल तर ते चालणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. दोषी असतील त्याला फासावर लटकवण्याची मागणी यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलीय.

इतर बातम्या :

Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया

दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, फडणवीस आक्रमक; आंदोलनाचाही इशारा

Agitation in Solapur led by Sadabhau Khot on the issue of sugarcane FRP

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.