काश्मीरमधून कलम 370 हटवलं, आता कणकवलीतून हटवणार, संजय राऊतांचा राणेंवर हल्ला

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि नारायण राणे (Shivsena and Narayan Rane Conflict) यांच्यातील संघर्ष वाढतच असल्याचं दिसत आहे. राणे कुटुंबाचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने चांगलीच ताकद (Shivsena and Narayan Rane Conflict) लावली आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटवलं, आता कणकवलीतून हटवणार, संजय राऊतांचा राणेंवर हल्ला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 16, 2019 | 6:14 PM

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि नारायण राणे (Shivsena and Narayan Rane Conflict) यांच्यातील संघर्ष वाढतच असल्याचं दिसत आहे. राणे कुटुंबाचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने चांगलीच ताकद (Shivsena and Narayan Rane Conflict) लावली आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनीही दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणे कुटुंबीयांवर (Sanjay Raut criticize Rane Family) घणाघाती टीका केली. आधी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं. आता कणकवलीतून देखील 370 हटवणार (Article 370 in Kankavali) असल्याचं म्हणत त्यांनी राणे कुटुंबीयांचं राजकारण संपवणार असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं.

संजय राऊत म्हणाले, “सिंधुदुर्ग आमचाच आहे. येथील आमचे तिन्ही उमेदवार जिंकणार आहेत. आम्ही संपूर्ण कोकण भगवं करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सगळीकडे फक्त भगवाच फडकवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे जसं काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आलं. तसंच सिंधुदुर्गमधील कलम 370 देखील 21 तारखेला हटवलं जाईल.” राऊत यांनी यावेळी राणेंच्या कोकणातील राजकीय अस्तित्वालाच आव्हान दिलं आहे.

मागील निवडणुकीत कणकवलीत काँग्रेस पक्षाची एक जागा निवडून आली होती. यावेळी तीही जागा निवडणून येणार नाही. मागील वेळी नितेश राणे काँग्रेसचे आमदार होते. मात्र, मोदींनी काँग्रेस संपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावेळी तिन्ही मतदारसंघात भगवा फकवायचा आहे. हीच सिंधुदुर्गवासीयांची इच्छा आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

राऊत म्हणाले, “आम्ही भाजपसोबत युती पाळतो. इतर कुणी आम्हाला युतीविषयी शिकवू नये. युती धर्माची व्याख्या आणि व्याप्ती याबद्दलही कुणी बोलू नये. आमच्या उमेदवारांविरोधात कोण उभे आहेत? त्यांना कोण रसद पुरवत आहेत? हे आम्हाला माहिती आहे.

शिवसेनेची कोकणात ताकद, मुख्यमंत्री आल्याने फरक पडत नाही

कोकणात शिवसेनेची स्वतःची ताकद असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं. ते म्हणाले, “कणकवलीमध्ये शिवसेनेची स्वतःची ताकद आहे. येथे शिवसेना स्वतःच्या हिमतीवर लढत आहे. त्यामुळे येथे प्रचारासाठी मुख्यमंत्री आले काय किंवा भाजपचे इतर नेते आले काय आम्हाला फरक पडत नाही. कणकवलीत शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा याविषयी पक्षात एकमत आहे आणि उद्धव ठाकरेंचीही हीच भूमिका आहे.”

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें