मोदी पवारांना गुरु मानतात; शरद पवार समजून घ्यायला या लोकांना 100 जन्म लागतील : संजय राऊत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Sharad Pawar) पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मोदी पवारांना गुरु मानतात; शरद पवार समजून घ्यायला या लोकांना 100 जन्म लागतील : संजय राऊत


नवी दिल्ली: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Sharad Pawar) पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरु मानतात. हे या लोकांनी लक्षात घ्यावं. त्यांना पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील, असं मत संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Sharad Pawar) व्यक्त केलं. यावेळी त्यांनी जो काही गोंधळ सुरु आहे तो माध्यमांनी घातल्याचाही आरोप केला.

संजय राऊत म्हणाले, “सरकारं स्थापन करायला अनेकदा जास्त दिवस लागले आहेत. भाजपचं सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये तर चार-चार, पाच-पाच महिने वेळ लागला आहे. हा जो काही गोंधळ आहे तो माध्यमांच्या मनात असू शकेन. ज्यांनी गोंधळ निर्माण करायचा आहे हे ठरवलंच आहे, राज्यात स्थिर सरकार येऊ नये असं ज्याने ठरवलं आहे त्यांना हा पेच किंवा गोंधळ वाटत असेन. त्यामुळेच ते तशाप्रकारच्या बातम्या पसरवत असतील. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही.”

नरेंद्र मोदी शरद पवारांना गुरु मानतात. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत जात आहोत असं म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं. शरद पवार समजून घ्यायला या लोकांना 100 जन्म लागतील. शरद पवार यांचा समाजकारण आणि राजकारणातील अनुभव मोठा आहे. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते बरोबरच आहे. शरद पवार यांना विरोधात बसण्याचंच जनमत मिळालं आहे आणि आम्ही स्वतंत्र लढलो आहे. मात्र, आता स्थिर सरकारसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

“रामदास आठवलेंचं हेच ऐकायचं बाकी होतं”

रामदास आठवलेंनी भाजपला 3 वर्ष आणि शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला सांगितला. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी रामदास आठवलेचं हेच ऐकायचं बाकी होतं असं म्हणत त्यांना कोपरखळी लगावली. ते म्हणाले, “रामदास आठवलेंकडून हेच ऐकायचं बाकी होतं. रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी केंद्रातील आपले अधिकार वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही.”

भाजपची मुस्लीम शासक मोहम्मद घोरीशी तुलना

सामनाच्या अग्रलेखात भाजपची तुलना मुस्लीम शासक मोहम्मद घोरीशी करण्यात आली. यात घोरीने जसं जीवनदान देणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना कृतघ्नपणे हालहाल करुन मारले, तसंच भाजप करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपला उभं करण्याचं, जागा देण्याचं काम शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी केलं. 2014 ला आम्ही युती तोडली होती, युतीत आम्हाला जायचं नव्हतं. त्यावेळी अमित शाह स्वतः आले. त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत गेलो नसतो, तर निकाल वेगळा असता.”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI