शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर, दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा

शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली (Sanjay Raut meet Sharad Pawar at silver oak).

शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर, दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा
sanjay raut-sharad pawar
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 6:52 PM

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राऊत यांनी स्वत: ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे (Sanjay Raut meet Sharad Pawar at silver oak).

“आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह थक्क करणारा आहे. संकट आणि असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित”, असं संजय राऊत ट्विटरवर म्हणाले.

“महाविकास आघाडी सरकार पूर्ण काळ टिकणार नाही, अंतर्गत मदभेदातून हे सरकार पडेल”, असा दावा भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. तर “महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पार करेल. त्यानंतर पुन्हा एकत्र निवडणुका लढू”, असं सांगण्यात येत आहे (Sanjay Raut meet Sharad Pawar at silver oak).

दरम्यान, काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. संजय राऊत यांनीदखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे उद्या (1 डिसेंबर) पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती; राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

तीन पक्षांनी एकत्र यावं ही माझी 2014 पासूनची इच्छा, पण तेव्हा पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.