Sanjay Raut : जनतेत जाऊन सत्ता परिवर्तन करणार, राऊत पुन्हा बोलले; भाजपपुढे गुडघे टेकणार नसल्याचाही इशारा

Sanjay Raut : शिंदे गटाने काही लोकांच्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. त्यावरूनही त्यांनी टोले लगावले. कोणत्या नियुक्त्या? शिवसेना इथेच आहे. कोणत्या आणि कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहते? त्यांना अधिकार काय? भातुकलीचा पोरखेळ सुरू आहे.

Sanjay Raut : जनतेत जाऊन सत्ता परिवर्तन करणार, राऊत पुन्हा बोलले; भाजपपुढे गुडघे टेकणार नसल्याचाही इशारा
जनतेत जाऊन सत्ता परिवर्तन करणार, राऊत पुन्हा बोलले; भाजपपुढे गुडघे टेकणार नसल्याचाही इशारा
Image Credit source: tv9 marathi
गणेश थोरात

| Edited By: भीमराव गवळी

Jul 29, 2022 | 10:57 AM

मुंबई: राज्यात पुन्हा सत्तांतर होणारच. मी माझ्या विधानावर ठाम आहे. पण हे सत्तांतर जनतेत जाऊन करणार आहे. जनताच हे सत्ता परिवर्तन घडवून आणेल, असा दावा करतानाच मिळेल त्या मार्गाने आम्ही सत्तांतर घडवून आणणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. राऊत यांनी काल राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी ईडीची कितीही चौकशी झाली तरी आपण कुणापुढे गुडघे टेकणार नाही, असा इशाराच भाजपला (bjp) दिला. राऊत यांना ईडीचं (ED) समन्स आलं आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणार आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने त्यांनी चौकशीतून थोडी सूट मागितली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपला टोले लगावले.

सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू, असं संजय राऊत म्हणाले.

कोणत्या नियुक्त्या? तुमचा संबंध काय?

शिंदे गटाने काही लोकांच्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. त्यावरूनही त्यांनी टोले लगावले. कोणत्या नियुक्त्या? शिवसेना इथेच आहे. कोणत्या आणि कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहते? त्यांना अधिकार काय? भातुकलीचा पोरखेळ सुरू आहे. त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. आज ही नियुक्ती, उद्या ती, परवा ती. कोणता पक्ष? आपला संबंध काय? ज्या ठाकरे परिवाराने वृक्ष वाढवला ज्या सावलीत मोठे झालो. त्याची फळे खाल्ली. त्याच्यावर कुरघोडी करत आहेत. ठिक आहे. तुम्ही बाजूला झालात. तुमचा पक्ष स्थापन करा आणि तुमचं अस्तित्व दाखवा, असं आव्हानच त्यांनी शिंदे गटाला दिले.

दिल्लीच्या वाऱ्या आणि फेऱ्या वाढल्या

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा करणं चांगली गोष्ट आहे. राज्यात महापूर आहे. 100 लोकांचा बळी गेला. गुरंढोरं वाहून गेली. अजून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही. दिल्लीच्या वाऱ्या आणि फेऱ्या वाढल्या आहेत. यातून मार्ग काढून मुख्यमंत्री दौरा काढत असतील तर चांगलं आहे, असं ते म्हणाले.

माझा आवाज दाबता येणार नाही

राऊत यांना ईडीचं समन्स आलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझा आवाज दाबण्यासाठीच हे सुरू आहे. पण माझा आवाज त्यांना दाबता येणार नाही. मी काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहीत आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी संजय राऊत गुडघे टेकणार नाही, असं ते म्हणाले. तसेच आज एक महिना झाला. अजून काय होईल काय सांगता येत नाही, असा चिमटा त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून काढला.

हे सुद्धा वाचा

शिंदेंना बोध आणि प्रेरणा मिळेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि लिलाधर डाके यांची त्यांनी भेट घेतली. त्यावरही राऊत बोलले. शिवसेनेत अनेक वादळ आले. संकटं आली. त्यावेळी मनोहर जोशी असतील, डाके असतील आणि किर्तीकर असतील हे नेते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेसोबत राहिले आहेत. त्यांना मुख्यमंत्री भेटले. नक्कीच त्यांच्यापासून शिंदेंना प्रेरणा आणि बोध मिळेल, असं ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें