मोदी, शाहांना माझ्याशिवाय राहावत नाही, ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात", अशी खोचक टीका शरद पवारांनी मोदी-शहांवर (Sharad pawar criticism on modi) केली.

मोदी, शाहांना माझ्याशिवाय राहावत नाही, ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

पुणे : “गृहमंत्री अमित शाह येथे येऊन आम्हाला विचारतात की तुम्ही काय केल. मात्र मी तुम्हाला विचारतो की तुम्ही पाच वर्षांपूर्वी अमित शाहांचं नाव तरी ऐकलं होतं का?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad pawar criticism on modi) यांनी विचारला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात”, अशी खोचक टीका शरद पवारांनी मोदी-शहांवर (Sharad pawar criticism on modi) केली.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, गृहमंत्री राज्यात सभा घेत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राज्यात हिंडत आहे, ही देशातील मोठी मंडळी येथे का आणली? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुनही सरकारवर निशाणा साधला. “राज्यात आतापर्यंत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यांनी कलम 370 हटवलं. तुमच्यापैकी कोण तिथे शेती करायला जाणार आहे. यांच्याकडे सांगायला काही नाही, म्हणून कलम 370 हटवलं असं सांगतात. शेतकरी आत्महत्या, कारखाना बंद, महिला अत्याचार यावर फक्त 370 कलम इतकचं सांगितलं जात आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

“राज्यात शेतीला पाणी नाही, शेतमाल दर नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला, जप्ती येत असल्यानं चिंतेने शेतकरी आत्महत्या करत आहे. मात्र संकटात त्यांना मदत केली पाहिजे,” असेही शरद पवार म्हणाले.

“आम्ही काय केलं हे जनतेला माहीत आहे. मराठा विद्यापीठ नामांतर विषय घेतला. मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी केली. ओबीसी सन्मान वागणूक संधी दिली. महिला आरक्षण दिलं, त्यांचा सन्मान केला. 33 टक्के आरक्षण निर्णय घेतला. अशा अजून किती गोष्टी सांगू,” असेही शरद पवार म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आणि आंबेडकर स्मारक एक वीट उभी केली नाही. शिवाजी महाराजांचे नावं घेता. मात्र किल्ले लग्न, पर्यटनसाठी जाहीर केले, मग तिथं बार सुरु होईल, तिथं छम छम व्यवस्था करता अशी टीका शरद पवारांनी केली. जिथं शौर्य होते तिथं बार करणार का?” असा प्रश्नही पवारांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *