‘राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार’, शशिकांत शिंदेंचा खळबळजनक आरोपावर जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या आरोपांबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय.

'राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार', शशिकांत शिंदेंचा खळबळजनक आरोपावर जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील, शशिकांत शिंदे


मुंबई : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवावरुन आमदार शशिकांत शिंदे चांगलेच नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100 टक्के राजकारण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या आरोपांबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. (Shashikant Shinde blames some NCP leaders responsible for the defeat, Jayant Patil’s cautious reaction)

शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपाबाबत जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. त्यांची भेट झाल्यानंतर मी त्याबाबत अधिक बोलू शकेल. त्यांचं मत काय आहे ते जाणून घेईन, असं जयंत पाटील म्हणाले. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची ते ठरवण्याचा अधिकार आहे. काँग्रेसनं एक भूमिका घेतली असली तरी इतर पक्ष आघाडीबाबत भूमिका घेतील, असा दावाही जयंत पाटील यांनी केलाय.

शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा

शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्वकियांसह आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार प्रहार केला. जिल्हा बँकेच्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. ते माझ्यावर झालेले नाहीत. निवडणुकीत गाफीलपणा नडल्याच्या बातम्या दिल्या गेल्या. परंतु, चर्चा सुरु झाल्या होत्या त्यावेळी काही जणांनी हस्तक्षेप वाढल्याचं म्हटलं त्यावर सविस्तर बोलणार आहे. सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली. सहकार पॅनेलचे इतर उमेदवारही पडले. त्यासंदर्भात पॅनेल प्रमुखांनी खुलासा करायला हवा होता. मात्र, त्यांनी न केल्यानं मला भूमिका घ्यावी लागत आहे. मी पराभूत झाल्यावर काहीजण नृत्यात सहभागी झाली यामुळे या कटाचा सुत्रधार कोण हे ओळखावं, असं शशिकांत म्हणाले. माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे.

उदयनराजे भोसले यांना बिनविरोध कसं केलं?

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांच्या जागेसंदर्भात रोज वर्तमानपत्रात छापून येत होतं. मात्र, अचानक काय घडलं की त्यांना बिनविरोध करण्यात आलं. जे पाच वर्ष प्रामाणिक राहिले त्यांना पराभतू करण्यात आलं. हे न समजण्या इतका दूधखुळा मी नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

शिंदेंनी निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती- पवार

शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण मला असं वाटतं की शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं शरद पवार म्हणाले. दरम्यान, शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीनंतर शरद पवार यांनी काल संध्याकाळी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांच्या पराभवाबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती.

इतर बातम्या :

ST Strike| शिष्टमंडळाला कोंडले, सदावर्तेंचा आरोप; परबांच्या राजीनाम्याची मागणी, पवार कलरफुल राजकारणात नापास झाल्याची टीका

Maharashtra MLC Election 2021: धुळे-नंदुरबारमध्ये भाजपाचे पारडं जड; महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागणार

Shashikant Shinde blames some NCP leaders responsible for the defeat, Jayant Patil’s cautious reaction

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI