Ramdas Kadam | मी शिंदे-ठाकरेंना एकत्र आणणार, अखेरपर्यंत भगवाच धरणार, हकालपट्टीनंतर रामदास कदमांनी सांगितली पुढची रणनीती

ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेनेत फूट पडली आहे, त्यांच्या नेत्यांची साथ सोडण्याऐवजी उद्धव ठाकरे स्वतःच्याच पक्षातील नेत्यांची हकालपट्टी करत आहेत, यावरून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले.

Ramdas Kadam | मी शिंदे-ठाकरेंना एकत्र आणणार, अखेरपर्यंत भगवाच धरणार, हकालपट्टीनंतर रामदास कदमांनी सांगितली पुढची रणनीती
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 11:25 AM

मुंबईः शिवसेनेत उभी फूट पाडण्याचे काहींचे मनसुबे आहेत. लोकांना ते हवं आहे, मात्र मी कदापि ते पूर्ण होऊ देणार नाही. मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकत्र आणणार. त्यांनी माझी हकालपट्टी केली तरी मी शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा मावळा आहे. मी मरेपर्यंत हाती भगवाच धरणार, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना संबोधले आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. आज त्यांनी टीव्ही 9 च्या माध्यमातून आपली खदखद बोलून दाखवली. बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली शिवसेना अशी पत्त्यासारखी कोसळून पडताना अतिशय दुःख होतेय, असं सांगताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले. पण याच शिवसेनेला वाचवण्यासाठी जीवाचं रान करेन. महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यात जाईल. तालुक्यात फिरेन. पण शिवसेना घरा-घरात पोहोचवेन. शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणेन, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय. उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांनी काल शिवसेनेतील नेतेपदावरून हकालपट्टी केली. शिवसेनेतील एक महत्त्वाचे नेते असलेले रामदास कदम रत्नागिरी जिल्ह्यातील असून खेड हा त्यांचा मतदार संघ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांचा मुलगा येथून उभा होता. राष्ट्रवादीचे संजय कदम यांना पराभूत कदम योगेश कदम विधानसभेत पोहोचले.

‘उद्धव आणि शिंदेंना एकत्र आणणार’

शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडलेल्या गटाला पुन्हा शिवसेनेत आणणार, असा निश्चय रामदास कदम यांनी बोलून दाखवला. ते म्हणाले, ‘ शिवसेनेत फूट कशी पडेल, काही लोकांना हवं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 32 किल्ले दिले. आग्रा येथून परतताना 40 किल्ले घेतले. अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांनीही काही पावलं मागे येण्याची गरज आहे. मी वयाने मोठा आहे. पण सल्ला देण्याएवढा मोठा नाही. आपण ठाकरे आहात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला विचारायचे… गजाजन कीर्तीकर, रामदास कदम.. नावं घेत विचारायचे. साहेब गेल्यापासून बैठका घेणंच बंद केलंय. रामदास कदमदेखील शिवसैनिक आहेत. फक्त भाषणात तुम्ही बोलताय, पण प्रत्यक्षात कृतीत नाही. आपली भेट होऊ शकणार नाही. माझी हकालपट्टी केली. मनातली खदखद आहे. स्वस्थ बसणार नाही. बाहेर पडणार. जसं पहिल्यांदा काम केलं होतं . अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत .बेळगावच्या आंदोलनात दहा लाखांचा अटकपूर्व जामीन घेऊन मी परत आलोय. मला बाळासाहेबांनी पाठवलं होतं. याची कल्पना तुम्हाला आहे का… हकालपट्टीने समाधान मिळतं. त्याआधी आमचं योगदानही काय आहे, ते बघा की.. उद्या बेळगावच्या केससाठी मी जेलमध्येही जाऊ शकतो. मराठी माणसासाठीच ना… तुम लढो हम कपडा संभालता है… असं म्हणणारा रामदास कदम नाही… माझी विनंती आहे. किती लोकांच्या हकालपट्ट्या करणार आहात?

‘राष्ट्रवादीने शिवसेनेचा घात केला’

ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेनेत फूट पडली आहे, त्यांच्या नेत्यांची साथ सोडण्याऐवजी उद्धव ठाकरे स्वतःच्याच पक्षातील नेत्यांची हकालपट्टी करत आहेत, यावरून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, ‘ आत एक आणि बाहेर एक असं मी कधीही करत नाही. स्पष्ट आहे. गुहागरमध्ये विरोधी पक्ष नेता असताना कसं पाडलं… हे नाही बोलायचं. मला पक्षानं पाडलं. अनेक गोष्टी आहेत. मला सगळ्या गोष्टी समजतात. दिवसाला पाचशे-हजार लोकांना भेटतो. जगलोय ते पक्षासाठी आणि मरणारही भगव्या झेंड्यासाठी. भविष्यात पक्षाचं नेतृत्व आपल्याकडेच असावं. आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. पण आज जे घडलंय ते शरद पवारांनी घडवून आणलंय. त्यांच्यामुळे पक्ष फुटलाय. त्यांच्यामुळे आमदार-खासादरांमध्ये असंतोष निर्माण झालाय. आपल्या लोकांची हकालपट्टी करण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या लोकांची हकाल पट्टी करा. नुकसान पक्षाचं होईल, आमचं नाही होणार… अशी विनंती रामदास कदम यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.