AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam on Shivsena : भीक दिली असं कसं म्हणू शकता उद्धवजी, रामदास कदम बोलताना ढसाढसा रडले

52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा रामदार कदम यांनी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. आदित्य यांच्यावरही टीका.

Ramdas Kadam on Shivsena : भीक दिली असं कसं म्हणू शकता उद्धवजी, रामदास कदम बोलताना ढसाढसा रडले
माजी मंत्री रामदास कदमImage Credit source: tv9
| Updated on: Jul 19, 2022 | 11:34 AM
Share

मुंबई : ‘शिवसेनेत (Shivsena) आम्ही 52 वर्ष घालवली. तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी  सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत,’ असा सवाल करत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam)  यांना आश्रू अनावर झाले. यावेळी ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेक सवाल केले आहेत. यावेळी वारंवार त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदम यावेळी म्हणालेत. दरम्यान, यावेळी रामदार कदम यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. रामदास कदम यांना यावेळी आश्रू अनावर झाले.

भीक दिली असं कसं म्हणू शकता…

शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मागच्या अनेक दिवसांपासून कदम नाराज होते. आज ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही सवाल केलेत. यावेळी त्यांनी शिवसेना कशी तळाला जात आहे, याचंही उदाहरण दिलं. याचवेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनाही सुनावलं. शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर टीका केली होती. त्यांच्या टीकेतून वारंवार बंडखोर आमदारांचा अपमानही केला. यावेळी संजय राऊतांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली होती. याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी ‘भीक दिली असं म्हणून नका, असं कदम यावेळी म्हणालेत.

हकालपट्टी राजीनामा दिल्यानंतर

शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी राजीनामा दिल्यानंतर माझी हकालपट्टी केल्याचं सांगत त्यांना राग व्यक्त केला. राजीनामा दिल्यावर हकालपट्टी केली, असं ते दोनदा म्हणत अजून किती जणांना पक्षातून काढणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थिती केलाय.

चौकडीला बाजूला करा

यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आजुबाजूच्या चौकडीला बाजू करावं, असंही म्हटलंय. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता टीका केलीय.

आदित्य ठाकरेंनी माझंच मंत्रालय घेतलं…

‘जे आदित्य ठाकरे आधी काका काका करायचे त्यांनीच माझं मंत्रालय घेतलं, असंही कदम यावेळी म्हणालेत. आदित्य ठाकरे मंत्रालयात येऊन बैठका लावायला लावायचे. आम्हीही ठाकरे असल्यानं सहन केलं, असंही कदम म्हणालेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.