अंगावर याल तर खबरदार; आम्ही शमीच्या झाडावर शस्त्रं ठेवली नाहीत; राऊतांचा इशारा

जकारण म्हणून अंगावर याल तर खबरदार. आम्ही शमीच्या झाडावर शस्त्रं ठेवलेली नाहीत. आमच्या कंबरेलाच ही शस्त्रं आहेत, असं सांगातानाच आज आम्ही गुद्द्यांनीच प्रहार करू, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

अंगावर याल तर खबरदार; आम्ही शमीच्या झाडावर शस्त्रं ठेवली नाहीत; राऊतांचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 4:34 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. राजकारण म्हणून अंगावर याल तर खबरदार. आम्ही शमीच्या झाडावर शस्त्रं ठेवलेली नाहीत. आमच्या कंबरेलाच ही शस्त्रं आहेत, असं सांगातानाच आज आम्ही गुद्द्यांनीच प्रहार करू, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला. (shiv sena leader sanjay raut slams bjp)

‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या पदाच्या चौकटीत राहून नेहमीच त्यांची भूमिका मांडत असतात. अधूनमधून ते मास्क काढतात. नियमांच्या चौकटीत राहून मास्क खालीवर करत असतात. राज्यपालांना त्यांनी दिलेलं पत्रं तुम्ही पाहिलंच. ते पूर्णपणे राजकीय उत्तर होतं. त्यामुळे देशात खळबळ माजली, असं सांगातनाच राजकारण म्हणून अंगावर याल तर आमची शस्त्र शमीच्या झाडावर नसतील. ती आमच्या कमरेलाच असतील, हे लक्षात ठेवा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

शिवसेनेच्या आजच्या दसऱ्या मेळाव्यात कोणते मुद्दे असतील? असा प्रश्न त्यांना केला असता आज आम्ही मुद्द्यांचा नाही गुद्द्यांचा विचार करू. मुद्दे आहेतच. त्याशिवाय राजकारण चालत नाही. पण गेली वर्षे भर शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्याला जशास तसे उत्तर मिळावं, ठोशास ठोसा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी आहे. पण मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे मी सांगू शकत नाही. ते महाराष्ट्राच्या मनातील बोलतील एवढं मात्र नक्की, असं ते म्हणाले.

दो दिल मिल गये है, हम क्या करेंगे

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्याबाबत त्यांना विचारलं असता दो दिल मिल गये है, हम क्या करेंगे, असं त्यांनी सांगितलं. खडसे जळगावात गेले. त्यांचं जंगी स्वागत झालं. त्यांचं भाषण आम्ही ऐकलं, असं सांगतानाच शरद पवार हे जाणते राजकारणी आहे. खडसेंना पक्षात घेण्यामागे त्यांची काही भूमिका असेल, असंही ते म्हणाले. (shiv sena leader sanjay raut slams bjp)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सडेतोड उत्तर देतील: अरविंद सावंत

‘मी घर बदलणार नाही, आहे तिथेच आहे’, पंकजा मुडेंकडून पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम

मोहन भागवत यांना सत्य माहिती, पण ते स्वीकारण्यास घाबरतात : राहुल गांधी

(shiv sena leader sanjay raut slams bjp)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.