Shiv Sena VBA Alliance | वंचित-शिवसेना युतीचा ‘या’ दिवसाचा मुहूर्त

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची या दिवशी घोषणा होणार आहे.

Shiv Sena VBA Alliance | वंचित-शिवसेना युतीचा 'या' दिवसाचा मुहूर्त
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:43 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याची एकच चर्चा होती. दोन्ही पक्षांची युती केव्हा होणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. मात्र या प्रश्नाला आता कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. अखेर शिवसेना-वंचितच्या युतीता मुहूर्त ठरला आहे.

प्रबोधनकार डॉट कॉमचा लोकार्पण सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीचे संकेत दिले होते.

शिवसेना-वंचित यांच्यातील युतीसाठी 23 जानेवारीचा मुहूर्त ठरला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीला दोन्ही पक्षांची युतीची घोषणा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप घडला. शिवसेना फुटली. यानंतर दलित नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला फायरब्रँड महिला नेता मिळाली.

पँथर भाई कांबळे हे भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कांबळे यांच्यासह काही दिवसांपूर्वी संघटनेचे असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यातच आता शिवसेना-वंचित युतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या युतीचा फायदा हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि वंचितला होईल, असंही म्हटलं जात आहे.

दरम्यान दलित मतं आपल्याकडे खेचण्यासाठी याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली. काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गट आणि जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली.

शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासगामी करण्यासाठी आणि राज्यातील सर्व समाज समूहांच्या हक्कासाठी शिंदे आणि त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे. थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल, असं कवाडे तेव्हा म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.