AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आमदारांची शर्यत, साताऱ्यात तीन आमदारांची वर्णी?

निवडणुकीच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळातील सहभागी होण्यासाठी आमदारांची शर्यत लागली आहे. यात साताऱ्यातील तीन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत (Three MLA get Ministry in satara) आहे. 

मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आमदारांची शर्यत, साताऱ्यात तीन आमदारांची वर्णी?
| Updated on: Oct 29, 2019 | 10:17 PM
Share

सातारा : सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात युतीचे चार आमदार निवडून आले आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरण (Three MLA get Ministry in satara) बदलले. निवडणुकीच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळातील सहभागी होण्यासाठी आमदारांची शर्यत लागली आहे. यात साताऱ्यातील तीन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत (Three MLA get Ministry in satara) आहे.

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसोबत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात महायुतीचे चार आमदार निवडून आले. या आमदारांपैकी भाजपमधून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे तर शिवसेनेतून शंभूराज देसाई आणि महेश शिंदे हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात सर्व राष्ट्रवादी अशी परिस्थिती असताना पहिल्यांदा महायुतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरकाव केला.

मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात दिलेल्या शब्दांची चर्चा सुरु आहे. म्हसवडच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरेंना प्रचंड मतांनी निवडून द्या. त्यांना मंत्रीपद देतो असे जाहीर वचन माणच्या सभेत जनतेला दिले होते. मुख्यमंत्र्यांचे ते म्हणणे जनतेने ऐकले. आता मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या शब्द कसा पाळतात यावर अनेकांचे लक्ष लागले (Three MLA get Ministry in satara) आहे.

तर दुसरीकडे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारसाठी आयोजित केलेल्या सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या राजघराण्याचा योग्य मान भाजपकडून राखला जाईल, असे म्हणाले होते. यामुळे भाजपकडून शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिपद देण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

याबरोबर सलग तीन टर्म आमदार म्हणून हॅट्रिक मिळवणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना गेल्या वेळी पाटणच्या जनतेने पालकमंत्री करावे अशी मागणी केली होती. त्यामुळे जनतेच्या मागणीचा विचार करून या वेळेस युतीच्या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई यांना स्थान मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यामुळे सातारा जिल्ह्यात एकाच वेळी तीन मंत्रीपदे देण्यात येणार आहे. त्यामुळे ही मंत्रीपद भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देणारी आणि विकासाला हातभार लावणारी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान युती सरकाराने दिलेला हा शब्द किती खरा ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार (Three MLA get Ministry in satara) आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.