Shivsena @55 | शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंचा सर्व शिवसैनिकांशी संवाद

यंदाही सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. (Shivsena 55th Foundation Day)

Shivsena @55 | शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंचा सर्व शिवसैनिकांशी संवाद
Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 7:15 AM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे. (Shivsena 55th Foundation Day CM Uddhav Thackeray will interact With ShivSainik through video conference)

वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने

शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक यासाठी उपस्थितीत असतात. पण सलग दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे यंदाही सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.

उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, जनजागृतीचे कार्यक्रम आणि अन्य समाजोपयोगी उपक्रम ठिकठिकाणी राबवले जाणार आहेत.

शिवसेनेच्या प्रत्येक कार्यालयावर भगवा ध्वज फडकवा 

तसेच शिवसेनेची प्रत्येक शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयात निवडक शिवसैनिकांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता भगवा ध्वज फडकवण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात यावी. मात्र शिवसैनिकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून वर्धापन दिन साजरा करावा, अशी सूचना शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

(Shivsena 55th Foundation Day CM Uddhav Thackeray will interact With ShivSainik through video conference)

संबंधित बातम्या : 

शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक, कारण काय?

नितेश राणेंचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न, शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कार

भाजपातर्फे 21 जूनला राज्यभरात योग शिबिरांचं आयोजन, तर 25 जूनला आणीबाणी विरोधात काळा दिवस पाळणार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.