AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना ‘आपडा’ म्हटले तर तुमचा तीळपापड का झाला?’

उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यामुळे ते गुजराती माणसाला ते 'आपडा' वाटणारच, असेही हेमराज शाह यांनी म्हटले. | Shivsena

'गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना 'आपडा' म्हटले तर तुमचा तीळपापड का झाला?'
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Jan 06, 2021 | 4:19 PM
Share

मुंबई: येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत होणााऱ्या शिवसेनेच्या गुजराती मेळाव्याच्या (Shivsena Gujrati Melava) पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या ‘जिलेबी-फाफडाचे’ राजकारण चांगलेच तापले आहे. आपल्या हक्काच्या व्होटबँकेला हात घातल्यामुळे सावध झालेले भाजप नेते शिवसेनेला टोमणे मारत आहेत. मात्र, गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना आपडा म्हटले तर तुमचा तीळपापड का झाला, असा सवाल आता शिवसेनेचे संघटक हेमराज शाह यांनी उपस्थित केला आहे. (Politics over Shivsena Gujarati Melava in Mumbai)

हेमराज शाह यांच्या हे शिवसेना संघटक असून त्यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता शाह हे भाजप नेत्यांच्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले. 1992-1993 च्या दंगलीवेळी शिवसेनेने गुजराती बांधवाना मदत केली, त्यांचे संरक्षण केले. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्वधर्मीयांना आपलेपणाने वागवल्याचे हेमराज शाह यांनी म्हटले.

‘मोदींचे नाव पुढे करुन गुजराती बांधवांना फक्त मतांसाठी वापरले’

भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे करून फक्त मतांपुरते गुजराती बांधवांना वापरले. ‘आपडो माणस’ म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले हेच खरे आहे ना? असा सवाल हेमराज शाह यांनी भाजप नेत्यांना विचारला. मुंबईतील गुजराती समाजाचे नेते भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे. गुजराती माणुस स्वाभिमानी आहे. भाजपने त्याला स्वत:ची जहागीर समजू नये. उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यामुळे ते गुजराती माणसाला ते ‘आपडा’ वाटणारच, असेही हेमराज शाह यांनी म्हटले.

‘मालवणचो खाजो भी आमचो आणि जलेबी-फापडा भी आपडो’

मुंबई महानगरापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी गुजराती मतदारांना साद घालणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील मतदारांना गृहीत धरण्याच्या शिवसेनेच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. ‘कोकण म्हणजे आम्हीच’, असा अहंकार असणाऱ्या पक्षाचे वस्त्रहरण सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले. (BJP leader Ashish Shelar slams Shivsena over Gujarati Melava in Mumbai)

यावेळी शेलार यांनी शिवसेनेच्या ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या नव्या टॅगलाईनविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर आशिष शेलार यांनी, मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो’, अशी टिप्पणी केली.

संबंधित बातम्या:

माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

“आता गुजराती भाषिकांचा मेळावा, भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील, बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम”, दानवेंचा टोमणा

(Politics over Shivsena Gujarati Melava in Mumbai)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...