कोणी फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं फोडू, शिवसेना आमदाराचा इशारा

कोणी आमदार फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं आम्ही फोडू, असा इशारा शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी दिला

कोणी फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं फोडू, शिवसेना आमदाराचा इशारा

मुंबई : शिवसेनेचा कोणताही आमदार फुटण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भीती नाही, उलट कोणी फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं आम्ही फोडू, याची त्यांना खात्री आहे, असं मुंबईतील चांदिवलीतून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झालेले उमेदवार दिलीप लांडे (Shivsena MLA on rebel) म्हणाले.

‘माझा शिवसैनिक, माझा आमदार फुटेल म्हणून उद्धव ठाकरे यांना कोणतीही भीती नव्हती. त्यांना सर्व आमदारांवर संपूर्ण विश्वास आहे आणि सर्व आमदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आपल्या आमदाराला कोणी फोडायचा प्रयत्न केला, तर प्रयत्न करणाऱ्याचंच डोकं फुटेल, याची उद्धव ठाकरेंना खात्री आहे.’ असं लांडे म्हणाले.

सत्तास्थापनेची संधी मिळाली, की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमदाराला मुंबईत येताना अडचण येऊ नये, सोयीस्कर व्हावं, म्हणून सर्वांना एकत्रितपणे ‘द रिट्रीट’ हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश दिल्याचं दिलीप लांडे म्हणाले.

शिवसेनेच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

तिघं एकत्र आले, तर विरोधात कोण ‘माय का लाल’ निवडून येत नाही : अजित पवार

‘प्रत्येक आमदार हा शेतकऱ्याशी निगडीत आहे. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. प्रत्येक आमदाराने जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा झाला आहे की नाही, हे पाहणं गरजेचं आहे. शासकीय यंत्रणा राबवली आहे की नाही, यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत करायची आहे.’ असं दिलीप लांडेंनी स्पष्ट केलं.

‘शिवसेनेची विचारधारा ही शेतकऱ्याच्या हितासाठी. उद्धव ठाकरेंनी सत्ता, खुर्ची बाजूला ठेवली आणि ज्या शिवसैनिकांनी, शेतकऱ्यांनी त्यांना मदत करण्याचं कर्तव्य बजावलं’ असंही लांडे म्हणाले. दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांचा पराभव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्तास्थापनेबाबत बैठका सुरु आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सत्ता स्थापन करायची झाल्यास तिन्ही पक्षांना आघाडी करुन संख्याबळ दाखवण्यावाचून पर्याय नाही. अशा काळात आमदार फुटण्याची (Shivsena MLA on rebel) भीती पक्षांना असल्यामुळे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI