Sanjay Raut | सत्तेची भांग प्यायलेले उद्या मातोश्री, सेना भवनावरही कब्जा करतील, शिवसेना शरण जाणार नाही, संजय राऊतांचा इशारा

नवी दिल्लीः सत्तेची, आमदारकीची भांग प्यायलेले शिवसेना भवनच काय, मातोश्रीवरही (Matoshri) कब्जा सांगतील. पण शिवसेना (Shivsena) एवढ्या सहजा सहजी शरण जाणारी नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार फोडल्यानंतर आता शिवसेनेतील 12 खासदारही शिंदेंच्या गटात शामिल होणार असल्याचं वृत्त आहे. तसेच शिंदे यांचा गट आता […]

Sanjay Raut | सत्तेची भांग प्यायलेले उद्या मातोश्री, सेना भवनावरही कब्जा करतील, शिवसेना शरण जाणार नाही, संजय राऊतांचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
संदीप राजगोळकर

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jul 19, 2022 | 10:36 AM

नवी दिल्लीः सत्तेची, आमदारकीची भांग प्यायलेले शिवसेना भवनच काय, मातोश्रीवरही (Matoshri) कब्जा सांगतील. पण शिवसेना (Shivsena) एवढ्या सहजा सहजी शरण जाणारी नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार फोडल्यानंतर आता शिवसेनेतील 12 खासदारही शिंदेंच्या गटात शामिल होणार असल्याचं वृत्त आहे. तसेच शिंदे यांचा गट आता शिवसेना भवनावरही दावा ठोकण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्राचं विभाजन हा भाजपचा मूळ उद्देश असून त्यासाठीच अखंड शिवसेनेचे तुकडे करण्याचे त्यांचे इरादे आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नवी दिल्लीत आज संजय राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यावरूनही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

शिवसेना भवनावर कब्जा…

एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेना भवनावर कब्जा करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या व्यवस्था करून ठेवल्या आहेत, त्या व्यवस्थेनुसार ते चालतंय. त्यांना महाराष्ट्रच तोडायचं आहे, म्हणून शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीतही जातो. यांचा काही भरवसा नाही. भांग प्यायलेली माणसं काहीही करू शकतात. नशेची, सत्तेची भांग जे पितात ते काही करतात. उद्या म्हणतील मातोश्री आमचं आहे. तेही कब्जा करू. उद्या म्हणतील बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेने स्थापन केली नाही असंही म्हणतील. त्यांची वैचारीक पातळी एवढी गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही असंही म्हणू शकतात. अशी त्यांची वक्तव्य आहेत. ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजासहजी हार आणि शरण जाणार नाही. हे माहीत असल्याने लोकांना भ्रमित करण्यासाठी विधाने केली जात आहेत.

आधीचे मुख्यमंत्री असे दिल्लीत येत नव्हते…

महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वारंवार भेट घेत आहेत. यावरून संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली. ते म्हणाले, ‘या आधीही मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी होते. नारायण राणे होते. दिल्लीत आल्याचं माहिती नाही. त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईत होत होत्या. आता देशाची राजधानी आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागलं तर त्यावर मी बोलणार नाही. पण सरकार स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले असतील तर महाराष्ट्र डोळे वर करून बघेल. लढाई कोणतीही असू द्या. चिन्हाची असेल, पक्षाची असेल…
ज्या पद्धतीनं छुपे वार सुरु आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे सुरु आहेत. अखंड महाराष्ट्र तोडायचा हे भाजपचे प्रमुख लोक बोलत आहेत. त्याआधी शिवसेनेचे तुकडे करु इच्छित आहेत. शिवसेनेची ताकद कमी करत आहेत. शिवसेनेच्या ताकतीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार पाठित खंजीर खुपसून जात असले तरीही ताकद कमी होणार नाही.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें