कोरोना निर्बंध, लसीचा गोंधळ, पावसाची दांडी, बेरोजगारीचे संकट याचा सामना कसा करायचा? शिवसेनेचा सवाल

कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

कोरोना निर्बंध, लसीचा गोंधळ, पावसाची दांडी, बेरोजगारीचे संकट याचा सामना कसा करायचा? शिवसेनेचा सवाल
कोरोना निर्बंध, लसीचा गोंधळ, पावसाची दांडी, बेरोजगारीचे संकट याचा सामना कसा करायचा? शिवसेनेचा सवाल
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 8:08 AM

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा तडाखा अनेकांचे कुटुंब उद्धवस्त करुनही थांबलेला नाही. तिसऱ्या लाटेची दहशत अद्याप कायम आहे. लखनौमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला तसे काही कोरोना लाटेबाबत करता येणार नाही. कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात कोरोना रुग्णवाढीसह इतर गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. (Shivsena Saamana Editorial on corona restriction vaccine rainstorms unemployment)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा तडाखा अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करूनही थांबलेला नाही. तिसऱ्या लाटेची दहशत कायम आहे. लखनौमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला तसे काही कोरोना लाटेबाबत करता येणार नाही. एक तर बेपर्वा लोकांवर दहशत निर्माण करून कोरोना निर्बंधांचे नियम पाळण्यास भाग पाडावे लागेल, नाहीतर लोकांनी स्वतःच नम्रपणे नियमांचा स्वीकार करून आणखी काही काळ जगावे लागेल. कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही इतकाच सल्ला आम्ही आज देऊ शकतो! असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

>>> कोरोना पूर्णपणे गेला नाही, पण लोक आता निर्बंध पाळायला तयार नाहीत असे वातावरण सर्वत्र दिसत आहे. हिमाचलमधील सिमला, कुलू मनाली अशा पर्यटनस्थळी गेल्या चार दिवसांपासून प्रचंड गर्दी उसळली आहे. ही गर्दी रोखता येत नसेल तर जम्मू-कश्मीरमधील अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच्या उत्सवांवर बंदी टाकून काय मिळवले? कोल्हापूरच्या व्यापारी मंडळानेही निर्बंध न पाळण्याची म्हणजे बंडाची भाषा सुरू केली आहे. हे लोण फार पसरू नये याबाबत सरकारला विचार करावा लागेल

>>> मुंबईची लोकल ट्रेन सेवा बंद आहे. सिनेमा, नाटय़गृह बंद पडल्याने या झगमगत्या व्यवसायावर जळमटे येऊ लागली; मुंबईचे बॉलीवूड व त्यांचे चमकते सितारे ही महाराष्ट्राची ओळखच नव्हे, तर वैभव मानले जाते, पण आता हा झगमगाट काळोखात गडप झाला आहे. लाखो लोकांचा रोजगार त्यामुळे ठप्प झाला आहे. कोल्हापूरप्रमाणेच मुंबईतील व्यापारी संतप्त झाल्याचे दिसत आहे.

>>> सध्या आठवडय़ातील पाच दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. आता मुंबईचे व्यापारी मंडळही बोलू लागले की, दुकानांची वेळ वाढवा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू. शाळा, कॉलेज बंदच आहेत तसे हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्योगाचीही वाताहत झाली. हॉटेलचा कर्मचारीवर्ग बेरोजगार झाला आहे त्याचप्रमाणे हॉटेल्सना भाज्या, दूधपुरवठा करणारे, लॉण्ड्रीवाले हे सगळेच धुळीस मिळाले आहेत.

>>> कोरोना व त्यामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे लोकांचे साफ कंबरडे मोडले. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असेल तर निर्बंध हटवावेत, असे सगळय़ांचेच म्हणणे पडत आहे. एका बाजूला कोरोनामुळे कडक निर्बंध तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविल्याचे विदारक चित्र आहे. पाऊस गायब झाल्याने राज्यातील पाच जिल्ह्यांत दुष्काळांची गिधाडे फडफडू लागली आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत पाऊसच गायब झाला आहे. कोकणातही पुरेसा पाऊस झाला नसल्याची नोंद आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 लहान-मोठय़ा धरण प्रकल्पांत जेमतेम 25 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध व दुष्काळ अशा कात्रीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक सापडले आहेत.

> केंद्राने नव्या फेरबदलात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बदलले व मनसुख मांडविया यांना आणले. पण लस तुटवडय़ाचा गोंधळ सुरूच आहे. केंद्रशासित लडाखसारख्या प्रदेशात 100 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, पण दुसऱ्या ‘डोस’चा गोंधळ सर्वच स्तरावर सुरू आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, राज्यांकडे साधारण दीड कोटीपेक्षा जास्त ‘डोस’ उपलब्ध आहेत. पण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा स्पष्ट दिसत आहे. मधून मधून लसीकरणास ब्रेक लागत आहे. लसीचा गोंधळ, पावसाची दांडी, निर्बंधामुळे निर्माण झालेले बेरोजगारीचे संकट या सगळय़ांचा सामना कसा करावा हा प्रश्न आहेच.

(Shivsena Saamana Editorial on corona restriction vaccine rainstorms unemployment)

संबंधित बातम्या :

मुंडे भगिनी समर्थकांचे राजीनामासत्र सुरुच, भाजप भटक्या विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र सरचिटणीसांचाही रामराम

नाना पटोले सनसनाटी बोलून जाणिवपूर्वक चर्चेत रहायचा प्रयत्न करतायत का?; वाचा सविस्तर

इंधनावरील करातून कमावलेल्या 25 लाख कोटींचे काय केले? : मल्लिकार्जुन खरगे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.