श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात, पक्षही ठरला, तिकीटही मिळालं!

छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam BSP) महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे. 

श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात, पक्षही ठरला, तिकीटही मिळालं!
Follow us
| Updated on: Oct 04, 2019 | 3:44 PM

अहमदनगर : छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam BSP) महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे.  मायावतींच्या बहुजन समाज पक्ष अर्थात बसपाने श्रीपाद छिंदमला (Shripad Chhindam BSP) अहमदनगरमधून उमेदवारी दिली आहे. अहमदनगर शहर मतदारसंघातून श्रीपाद छिंदम राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात शड्डू ठोकतील.

श्रीपाद छिंदम नगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आला. मात्र आता श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. श्रीपाद छिंदमने महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली आहे. काही दिवसापूर्वीच छिंदमने नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेला होता.

श्रीपाद छिंदमला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अस्पष्ट होतं. मात्र छिंदमला बसपाने उमेदवारी दिली आहे.  छिंदमने नगर महापालिका निवडणूक अपक्ष लढून जिंकून दाखवली होती.

नगर महापालिका निवडणुकीत विजय

9 डिसेंबर 2018  रोजी अहमदनगर महापालिकेची निवडणूक झाली आणि 10 डिसेंबरला निकाल लागला. श्रीपाद छिंदम अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल 1970 मतांनी निवडून आला. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना 2562 मतं मिळाली. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार 100 ते 200 मतांच्या फरकाने पडले. पण छिंदमचा विजय तब्बल 1970 मतांनी झाला.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या छिंदमला उपमहापौर करण्यात आलं होतं. मात्र शिवरायांविषयी बरळल्यानंतर त्याच्याविरोधात सर्वसामान्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान

श्रीपाद छिंदम हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लिल शब्द वापरुन आक्षेपार्ह बरळला होता. त्यावेळी सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवप्रेमींनी छिंदमला चोपही दिला होता. सुरक्षेसाठी नगरमधून छिंदमला बाहेर हलवण्यात आले होते. मात्र, काही दिवस लोटल्यानंतर छिंदम पुन्हा राजकारणात सक्रीय आहे.

संबंधित बातम्या   

नगरचं उपमहापौरपद शापित, ज्यांनी पद भूषवलं त्या सर्वांची अवस्था काय?

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम नगरमधून तडीपार

विजयानंतर श्रीपाद छिंदम शिवरायांसमोर नतमस्तक   

स्पेशल रिपोर्ट : वादग्रस्त श्रीपाद छिंदम विजयी   

शिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल 

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.