ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव दिला गेलाय; राऊतांच्या ‘त्या’ ट्विटवर नितेश राणेंचा निशाणा

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊतांच्या 'त्या' ट्विटवर नितेश राणेंचा निशाणा; पक्ष विलीन करण्याचाही केला उल्लेख

ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव दिला गेलाय; राऊतांच्या 'त्या' ट्विटवर नितेश राणेंचा निशाणा
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 12:10 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत यांच्या एका ट्विटवरून नितेश राणे यांनी निशाणा साधण्यात आला आहे. जागा वाटपावर फार मोठं ज्ञान संजय राऊत ट्विटरवरून देता आहेत. माझ्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही राष्ट्रवादीत विलीन करावी असा प्रस्ताव दिला गेलाय, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील लोकसभेच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. अशात संजय राऊत यांनी आज सकाळी याबाबत ट्विट केलं आहे.

कसेल त्याचीजमिन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा.हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. यावरूनच नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

नवा संसद महाल! मोदींचा वास्तू प्रवेश!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे.

आजच्या सामना अग्रलेखाचं शीर्षक चुकलं आहे, असं मला वाटतं. मालक, महाल आणि मालकाचा महाल! असं शीर्षक देऊन अग्रलेख आला असता तर तो सत्यपरिस्थितीवर झाला असता. आजचा अग्रलेख जळफळाटाने लिहिला गेलाय, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मालकाने मातोश्री 2 च्या नावाखाली जो महाल बांधलाय तो कसा बांधला. कसा मिळवला याची माहिती संजय राऊतने लिहायला हवी होती. आमच्या माहितीप्रमाणे मातोश्री 2 मध्ये इंटेरियरसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा पैसा आणला कुठून? ही माहिती संजय निरुपमने बाहेर आणलीय. म्हणजे माहिती देणारे महाविकास आघाडीचेच लोक आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.