AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो; पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

...म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो; पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंचे डुप्लीकेट विजय मानेंची हायकोर्टात धावImage Credit source: social media
| Updated on: Sep 21, 2022 | 7:55 AM
Share

मुंबई :  पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ( Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला पत्रकरांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत? पांढरे कपडे का घातला? तेव्हा त्यांना मी सांगितले की भगवा आमच्या हृदयात आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं मुख्यमंत्र्यांनी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदूत्व, शेतकरी, मतदार यांच्याशी कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहिती आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.

पुढे बोलताना ते म्हणाले की मला एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घातल नाहीत? पांढरे का घालतात तेव्हा मी त्यांना उत्तर दिले भगवा हा आमच्या  हृदयात आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही बाळासाहेंबाच्या विचाराचे पाईक आहोत, आणि त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असल्याचंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गट, शिवसेना आमने-सामने

अनेकदा शिंदे गट आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजाकारण चांगलेच तापले होते. रामदास कदम यांच्या या वक्तव्याला शिवसैनिकांकडून आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

दुसरीकडे वेदांतावरून देखील विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. वेदातांवरून देखील शिंदे गटाकडून शिवसेनेवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...