शरद पवारांचंही काँग्रेससोबत भांडण, पण ते लाल दिवा किंवा निवडून येणार नाही म्हणून नाही : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील काही काळात राष्ट्रवादी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केलीय.

शरद पवारांचंही काँग्रेससोबत भांडण, पण ते लाल दिवा किंवा निवडून येणार नाही म्हणून नाही : सुप्रिया सुळे


नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील काही काळात राष्ट्रवादी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केलीय. “आधी दररोज कोण पक्ष सोडून जातंय याची काळजी होती. मात्र, हे लोक तिकडं गेली ते बरं झालं असं वाटतंय. गेलात तिकडे सुखात राहा, इकडं माती करायला येऊ नका,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या (Supriya Sule criticize ex NCP leaders who left party in past in Navi Mumbai).

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “काही भाजपच्या लोकांच्या मनातही तसं आहे. त्यांनाही भाजपची सत्ता गेल्यानं बरं वाटतंय. हे सर्व इनकमिंग सुरु केलं आणि त्या इनकमिंगमुळेच आमची सगळी माती झाली आमच्या पक्षाची असंच ते म्हणत आहेत. काही लोकांमध्ये गुण असतात ते कुठेही गेले तरी ते तसंच होतं. त्यामुळे मला तर बरं वाटतं की बरीच लोकं तिकडं गेली. माझं म्हणणं आहे आता गेलाय ना तिथेच गुणाने राहा, परत माती करायला इकडे येऊ नका.”

‘शरद पवारांचंही काँग्रेससोबत भांडण, पण ते लाल दिवा किंवा निवडून येणार नाही म्हणून नाही’

“विचारांवर एक निष्ठा असते. तुम्ही एखादी मतं बदलली तरी हरकत नाही. माणसाच्या आयुष्यात तसं होऊ शकतं. तुम्ही जेव्हा इनकमिंक येता ना तेव्हा सत्ता नसताना काही तरी धड भांडण करुन या. शरद पवारांचंही काँग्रेससोबत भांडण झालं. पण ते भांडण लाल दिव्यावरुन किंवा निवडून येणार नाही म्हणून झालं नाही. काहीतरी विचारांमध्ये मतभेद झाले म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. यांनी फक्त सत्तेसाठी पक्ष सोडला. म्हणजे स्वतःची काही आयडेंटिटीच ठेवली नाही. याचा अर्थ यांना स्वतःत कॉन्फिडन्सच नाही की मी निवडून येईल,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

“पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं. 52 लोक शरद पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते 2019 मध्ये भाजपचं झालं. त्यातून सेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आलं. ‘दाल मे काला है इधरसे निकलो’. उध्दव ठाकरेंनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्र सरकार सव्वा वर्षात कुठलीही टीका करु शकले नाही कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी महाराष्ट्रात उत्तर देते. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करतोय.”

हेही वाचा :

“पावसातल्या सभेवेळी एकटा कॅमेरावाला होता, म्हणाला दीड लाखाचा आहे, भिजला तर भरुन पाहिजे”

Video : पावसातल्या सभेला कारणीभूत साहेब नाहीत, तो एक माणूस, सुप्रिया सुळेंनी दीड वर्षांनी गुपित फोडलं

52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास : सुप्रिया सुळे

व्हिडीओ पाहा :

Supriya Sule criticize ex NCP leaders who left party in past in Navi Mumbai

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI