‘धन्यवाद मोदी सरकार’, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी, पाहा काय प्रकरण…

वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मोदी सरकारला टोमणे लगावणारे बॅनर्स लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केलाय. | Thank You Modi Govt NCP Flex in Pune

'धन्यवाद मोदी सरकार', पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी, पाहा काय प्रकरण...
पुण्यात इंदरवाढीविरोधात राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 8:14 AM

पुणे : वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मोदी सरकारला टोमणे लगावणारे बॅनर्स लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केलाय. ‘धन्यवाद मोदी सरकार’, अशा आशयाचे बॅनर्स लावून सर्वसामान्यांवरचा महागाईचा मार कमी करावा, अशी मागणी या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (Thank You Modi Govt NCP Flex in Pune Against Hike Fuel Rate)

केंद्र सरकारने दिवसेंदिवस केलेली गॅस दरवाढ असो वा पेट्रोल डिझेल दरवाढ असेल… याबाबत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी महिला भगिनी रस्त्यावर उतरुन आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवत आहोत, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

इंधनाचे भाव गगनाला…

फेब्रुवारी महिन्यांत 670 रुपयांना असणारा गॅस सिलेंडर हा 100 रुपयांना वाढला आणि 770 रुपयांना झाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गॅस दरवाढीची नोंद ही फेब्रुवारी महिन्यातली आहे. आता पुन्हा मार्च महिन्यात गॅस दरवाढ 50 रुपयांनी वाढली. त्यामुळे आज हा दर 820 रुपयांपर्यंत गेला आहे. पंतप्रधान मोदी साहेब आपण सत्तेत येण्यापूर्वी आम्हा महिला भगिनींना तुम्ही आश्वासन दिलं होतं की जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवू. पण आपण कोणतंही आश्वासन पाळलं नाही, असं चाकणकर म्हणाल्या.

5 कोटी महिलांपर्यंत आपण उज्वला गॅस योजना पोहोचवणार असं सांगितलं पण गेल्या काही दिवसांत केलेल्या जहिराती आता जनतेसमोर येत आहेत. किती महिलांपर्यंत ही योजना पोहोचली, हा एक संशोधनाचाच भाग आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर आपण जहिराती लावल्या. त्या जहिराती आमच्या कराच्या पैशातून लावल्या आहेत. या सगळ्या जहिराती फसव्या आहेत. आम्हा महिला भगिनींमध्ये हीच संतापाची लाट आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

NCp Flex in Pune

NCp Flex in Pune Against Fuel Rate

राष्ट्रवादीची मोहिम काय?

राज्यामध्ये धन्यवाद मोदी सरकार ही मोहिम राबवत आहोत. इथून पाठीमागे मोदी साहेबांनी जी महिला वर्गाच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली ती आता आम्ही होवू देणार नाही. महिला वर्ग आता मोदींना मतदान करणार नाही, असा या मोहिमेपाठीमागचा उद्देश असल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.

(Thank You Modi Govt NCP Flex in Pune Against Hike Fuel Rate)

हे ही वाचा :

आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, चाकणकर नवनीत राणांवर भडकल्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.