Shivsena : मातोश्री बाहेर दिवस घालवला पण पक्ष प्रमुखांना वेळ नाही मिळाला, शिवसैनिकाची नाराजी नेमकी काय?

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनीही पक्षप्रमुख हे भेटण्यासाठी वेळच देत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मतदार संघातील विकास कामे तर मार्गी लागतच नव्हती पण आमदारांच्या नाराजीचे हे एक मुख्य कारण होते. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Shivsena : मातोश्री बाहेर दिवस घालवला पण पक्ष प्रमुखांना वेळ नाही मिळाला, शिवसैनिकाची नाराजी नेमकी काय?
शिवसैनिक मोहन यादव
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 5:40 PM

मुंबई : (अविनाश माने) शिवसेनेतील बंडामागे एक कारण होते ते की (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी वेळ देत नव्हते. भलेही या आमदारांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली असली तरी ते एक महत्वाचे कारण समजले जात होते. यावर विश्वास ठेवायचा की नाही हा जनतेचा प्रश्न आहे. पण एका (Shivsainik) शिवसैनिकाचीही नाराजी तीच राहिलेली आहे. दौंडमधील कट्टर शिवसैनिक असलेले मोहन यादव हे कुटुंबियांसमवेत मातोश्रीवर दाखल झाले होते. यापूर्वीही ते दाखल होताच बाळासाहेब ठाकरे (Matoshri) मातोश्रीवरुन खाली उतरत होते पण आता तसे होत नाही. सकाळी 8 वाजता मोहन यादव हे दाखल झाले असतानाही आपली पक्षप्रमुख यांनी भेटही घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

मोहन यादव हे दौंड येथील असून ते गेल्या 40 वर्षापासून कट्टर शिवसैनिक राहिलेले आहेत. यापूर्वीही ते शिवसेनेचा प्रचार करीत मातोश्रीवर आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खाली उतरत असत. पण आता तसे झालेले नाही. मोहन यादव हे कुटुंबियांसोबत मातोश्रीवर दाखल झाले होते. पण त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही.

मोहन यादव हे उद्धव ठाकरे यांची भेट होईल म्हणून सकाळी 8 च्या दरम्यानच, मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यांनी भेटण्याचा प्रयत्नही केला पण त्यांना भेटता आले नाही. शिवाय पावसाची रिमझिम सुरु असताना ते तटस्थ होते. दुपारपर्यंत त्यांना भेट मिळालेली नव्हती. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनीही पक्षप्रमुख हे भेटण्यासाठी वेळच देत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मतदार संघातील विकास कामे तर मार्गी लागतच नव्हती पण आमदारांच्या नाराजीचे हे एक मुख्य कारण होते. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मोहन यादव यांची स्वत:ची भगवी अशी ओळख आहे. शिवाय ते गेल्या 40 वर्षापासून कट्टर शिवसैनिक राहिलेले आहेत. त्यांच्या लक्षणीय प्रचारामुळे ते मातोश्रीवर आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील माझी भेट घेत होते असे त्यांचे म्हणणे होते. पण आता पक्ष प्रमुखांची भेट झाली नाही ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले आहेत.

एवढे सर्व असतानाही आता पक्षाच्या झालेल्या परस्थितीवर यादव यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, संघटनात्मक बदलानंतर शिवसेना पुन्हा उभारी घेणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नाराज असले तरी ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्यातला आणि बंडखोर आमदारांमधला हाच एकमेव फरक म्हणावा लागेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.