आतापर्यंत एकाचवेळी दोन जागांवर निवडणूक लढवलेले नेते

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि केरळमधील वायनाड येथून उभे राहत आहेत. दोन जागेवरुन निवडणूक लढवत असल्याने ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. एकीकडे भाजप राहुल गांधींवर अमेठीमधून पळून जात असल्याचा आरोप करत आहे. तर काँग्रेसच्या मते, दक्षिण भारतात पक्षाला मजबूत करण्यासाठी निवडणूक लढवली जात आहे. राहुल गांधी दोन जागांवरुन निवडणूक …

आतापर्यंत एकाचवेळी दोन जागांवर निवडणूक लढवलेले नेते

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि केरळमधील वायनाड येथून उभे राहत आहेत. दोन जागेवरुन निवडणूक लढवत असल्याने ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. एकीकडे भाजप राहुल गांधींवर अमेठीमधून पळून जात असल्याचा आरोप करत आहे. तर काँग्रेसच्या मते, दक्षिण भारतात पक्षाला मजबूत करण्यासाठी निवडणूक लढवली जात आहे. राहुल गांधी दोन जागांवरुन निवडणूक लढवत असल्याची राजकारणात जोरदार चर्चा आहे. मात्र, दोन जागांवरुन निवडणूक लढणे ही पहिलीच घटना नाही. याआधीही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधीपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन जागांवरुन निवडणूक लढवल्या आहेत.

अटल बिहारी वाजपेयी

एकापेक्षा अधिक जागेवर निवडणूक लढवण्यात पहिले नाव अटल बिहारी वाजपेयी यांचे येते. लखनौ जागेवरुन 1952 मधील निवडणुकीत पराभव झाल्याने 1957 च्या निवडणुकीत तीन जागांवरुन अटल बिहारी वाजयपेयींनी निवडणूक लढवली होती. भारतीय जनता संघाच्या तिकिटावर अटल यांनी लखनौ, मथुरा आणि बलरामपूर जागेवरुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर अनेकदा वाजपेयींनी दोन जागांवरुन निवडणुका लढवल्या होत्या.

इंदिरा गांधी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना रायबरेलीमधून पराभव पत्कारावा लागला होता. यानंतर त्यांनी 1980 च्या निवडणुकीत रायबरेली आणि मेडक (तेलंगणा) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर दोन्ही जागांवरुन इंदिरा गांधींचा विजय झाला. पण नंतर त्यांनी मेडकची जागा सोडली.

लालकृष्ण अडवाणी

भाजपचे वरीष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी 1991 मध्ये गुजरातच्या गांधीनगर आणि नवी दिल्ली येथून निवडणूक लढवली होती. यावेळी अडवाणींनी दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर त्यांनी नवी दिल्लीची जागा सोडली.

एन टी रामाराव

तेलगू देसम पक्षाचे संस्थापक एनटी रामाराव यांनी 1985 विधानसभा निवडणुकीत तीन जागांवरुन निवडणूक लढवली होती. आंध्र प्रदेशच्या गुडीवडा, हिंदुपूर आणि नलगोंडा या तिन्ही जांगावर रामाराव यांचा विजय झाला होता.

देवी लाल

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री देवी लाल यांनी 1991 मधील निवडणुकीत तीन लोकसभा जागांवर निवडणूक लढवली होती. सीकर, रोहतक आणि फिरोजपूर. पण या तिन्ही जांगावर देवी लाल यांचा पराभव झाला होता.

लालू प्रसाद यादव

आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी 2004 मध्ये छपरा आणि मधेपुरा या जागांवरुन निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागांवर त्यांचा विजय झाला होता. यानंतर लालू यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत दोन जागांवर निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

मुलायम सिंह यादव

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनीही 2014 लोकसभा निवडणुकीत आजमगड आणि मैनपुरी येथून निवडणूक लढवली होती. तसेच दोन्ही जांगावर त्यांना विजय मिळाला होता.

सोनिया गांधी

युपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी यांनी 1999 लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि कर्नाटकच्या बेल्लारी जागेवर निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन्ही जागांवर विजय मिळवला होता.

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या वडोदरा आणि यूपीच्या वाराणसी जागांवरुन निवडणूक लढवली होती. मोदी या दोन्ही जागंवर मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *