मायचा पूत जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथं ठेचू, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात थेट इशारा

माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटायला हवं, अशी इच्छा ईश्वरचरणी करतोय. कारण मी पुन्हा येईन म्हणत होते, ते बोलत आहेत मी गेलोच नाही, बसं तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते.

मायचा पूत जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथं ठेचू, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात थेट इशारा

मुंबईः ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू, असं म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. पद येतील आणि जातील, सत्ता येईल आणि जाईल पण अहमपणा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नको ही शिकवण मला आजोबांनी आणि वडिलांनी दिली, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांसह विरोधकांवर जोरदार टीकास्त्र

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पूजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवार हाच मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

पुन्हा येईन म्हणणारे आता बोलत आहेत मी गेलोच नाही

माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटायला हवं, अशी इच्छा ईश्वरचरणी करतोय. कारण मी पुन्हा येईन म्हणत होते, ते बोलत आहेत मी गेलोच नाही, बसं तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

हाच आशीर्वाद तर ताकद आहे

मी जनतेशी नेहमी नम्र राहत असतो. आशीर्वाद घेत असतो. हाच आशीर्वाद तर ताकद आहे. हे मागून कुणाला मिळत नाही. हे खरं वैभव आणि ऐश्वर्य आहे. हे जोरजबरदस्तीने मिळत नाही. ती कमवण्याची परंपरा मिळालेली आहे. मला काही गोष्टीचं नवल वाटतं, आजसुद्धा मी काय बोलणार कोणाचा समाचार घेणार, कोणाचे वाभाडे काढणार, बऱ्याच दिवसांनी बोलतोय, एकतर मनामध्ये विषयांची गर्दी झालीय. पण पंचायत अशीय की कोरोनामध्ये गर्दी झालीय. बरं गर्दीमध्ये दोन लसी घेतल्यात कारे बाबा? असं विचारु शकत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

मी माझ्या जनता-जनार्दनाशी बोलतोय

मास्क कसा घालणार विचारणार. पण तरी मला हेही माहिती आहे, माझ्या भाषणानंतर अनेकजण माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी, तोंडामध्ये बोंडकं घालूनच बसलेत. माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी. चिरकू द्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मी त्यांच्याशी बोलत नाहीय. मी तुमच्याशी बोलतोय. माझ्या जनता-जनार्दनाशी बोलतोय. ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू. काही वाटेल ते बोलायचं, कुटुंबीयांची बदनामी करायची. कारण ते त्यांचं रोजगार हमीचं काम सुरू आहे. तू चिरकलायस किती, एवढा चिरकायला पण माझा वाडा चिरेबंद आहे. डोकी फुटतील पण तडा जाणार नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावलेत.

संबंधित बातम्या:

Dussehra 2021 Live Updates | आपला आवाज दाबणारा जन्माला येऊच शकत नाही : उद्धव ठाकरे

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’, भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन करत किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

uddhav thackeray criticism on opposition party leader in shivsena dasara melava

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI