राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी, तर शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या : उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका (Uddhav Thackeray criticize Sharad Pawar) केली आहे.

राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी, तर शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या : उद्धव ठाकरे


पंढरपूर: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका (Uddhav Thackeray criticize Sharad Pawar) केली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता भ्रष्टवादी झाली आहे, तर शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या असल्याची जहरी टीका (Uddhav Thackeray criticize Sharad Pawar)  उद्धव ठाकरेंनी केली. ते आज (14 ऑक्टोबर) करमाळा (Uddhav Thackeray in Pandharpur) येथील महायुतीच्या जाहीर प्रचारसभेत बोलत होते. करमाळा येथून रश्मी बागल या शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार आहेत.

आमचं सरकार आल्यावर जे अल्पभुधारक आणि गरीब शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात वर्षाला 10 हजार रुपये जमा होतील. याची जबाबदारी आमचं सरकार घेईन, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या सभेत दिलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेने गरीबांसाठी 10 रूपयात थाळीचे जेवण देण्याचं आश्वासन दिलं. यावर पवारांनी टीका केली. होय, मी स्वयंपाकी आहे. जनतेसाठी मी कोणतीही कामं करायला तयार आहे.” आपण स्वयंपाकासाठी तयार आहे, पण स्वयंपाकासाठी अजित पवारांचं पाणी नको, असं म्हणत ठाकरेंनी पवारांना खोचक टोला लगावला.

मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झालेल्या गळतीवरुनही ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं अस्तित्व फक्त नावापुरतं उरलं आहे. गेल्या 5 वर्षात राष्ट्रवादीचे किती तुकडे झाले हे मोजता देखील येणार नाहीत, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI