AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्ष ऑन रेकॉर्ड तरी आहे; तुमचं.., उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं

आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मार्मिक प्रबोधन शतक' पुस्तकचं प्रकाशन झालं, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्ष ऑन रेकॉर्ड तरी आहे; तुमचं.., उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 29, 2026 | 8:57 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  ‘मार्मिक प्रबोधन शतक’ पुस्तकचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  डिलीमिटेशन विधेयकावरून त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे.  डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला घटना बदलायची आहे, म्हणून पक्ष फोडले जात आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

हे राजकीय पक्षांना देखील वापरतात, आणि त्यांचं काम झालं की फेकून देतात. तुम्ही रामाला देखील वापरून फेकून दिलं आहे. ज्या रामाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटताना तुम्हाला लाज नाही वाटत? तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर म्हणतात बघा यांनी हिंदूत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? मुळात प्रश्न आहे तुम्ही आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज, लज्जा आणि शरम सोडली होती, मग आता फरक काय पडतोय? असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  तिकडे हा प्रकार सुरू आहे, ते घराणेशाहीवर बोलतात, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही पण तिची एक परंपरा आहे आणि तिचा मला अभिमान आहे. आमच्या घराण्याचा इतिहास किमान शंभर वर्ष ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? याचा काही आगा पिछा नाहीये, आणि जाबादारी तर त्याहून नाहीये, मेरा क्या मै तो झोला लेके निकल जाऊंगा, मग देश का क्या होगा? म्हणून मी म्हणतो कौतुक ऐकन अन् ठाकरे कुटुंब या दोन टोकाच्या दोन गोष्टी आहेत. कारण आम्हाला ते नाही पटत, आम्ही अन्याय आणि ढोंगावर लाथ मारून पुढे जाणारे लोकं आहोत. जे सत्य आहे, त्याच्या खांद्याला खांदा लावून चालणारं आमचं कुटुंब आहे, आणि हीच आमची शिवसेना आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग