Video | महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री करणार! उद्धव ठाकरे यांचे मोठे संकेत, कोण असेल तो चेहरा?

उद्धव ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण असेल? तो शिवसेनेचाच असेल का? की बाहेरच्या पक्षाच्या चेहऱ्याला संधी दिली जाईल... या चर्चांना उधाण आले आहे.

Video | महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री करणार! उद्धव ठाकरे यांचे मोठे संकेत, कोण असेल तो चेहरा?
संग्रहित छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 10:15 AM

मुंबईः महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री (Lady CM) विराजनमान करण्याचे मोठे संकेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकलं. पक्षाचे चिन्ह म्हणून अन्याय जाळणारी मशाल आपल्याला मिळाली आहे. ही अंधःकार दूर करणारी मशाल आपण तितक्याच ताकतीने वापरू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच आगामी मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदाविषयी संकेतही दिले.

कुठे केलं वक्तव्य?

मुंबईत काल लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या वेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं.

नेमकं वक्तव्य काय?

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. मी सध्या अनुभवतोय… गद्दार आता मूठभरही नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत.

भाषणात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. महिला असो किंवा पुरुष…

पाहा उद्धव ठाकरे यांचं ते वक्तव्य…

नवा चेहरा कोण?

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे वक्तव्य खूप विचारपूर्वक केलेलं असणार, हे निश्चित आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण असेल? तो शिवसेनेचाच असेल का? की बाहेरच्या पक्षाच्या चेहऱ्याला संधी दिली जाईल… या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेतल्या नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे,  प्रियंका चतुर्वेदी अशा महिला नेत्यांनी वारंवार शिवसेनेच्या भूमिका परखडपणे मांडल्या आहेत. त्यात रश्मी ठाकरेंचंही नाव नेहमीच चर्चेत असतं. नव्याने आलेल्या सुषमा अंधारेही शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख निर्माण करत आहेत. तर महाविकास आघाडीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही चर्चा आता रंगू लागली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.