AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नार्वेकर लबाडला सांगा, हिंमत असेल तर इकडे…’, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना ललकारले

"जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इकडे येऊन बोल मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कुणाची? बंद दाराआड तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी दिल्याच नाही सांगतो, त्याचे पुरावे दिले आहेत", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्षांना ललकारलं आहे.

'नार्वेकर लबाडला सांगा, हिंमत असेल तर इकडे...', उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना ललकारले
| Updated on: Jan 23, 2024 | 8:54 PM
Share

नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या सभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही निशाणा साधला. राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला. यावेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेची 2013 ची घटना दुरुस्ती मिळालीच नाही, असा दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2013 च्या पक्षाच्या प्रतिनिधीसभेचा व्हिडीओच प्रसारमाध्यमांसमोर दाखवला होता. या प्रतिनिधीसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील बघायला मिळाले होते. याच मुद्द्याचा धागा पकडत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ललकारलं.

“जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इकडे येऊन बोल मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कुणाची? बंद दाराआड तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी दिल्याच नाही सांगतो, त्याचे पुरावे दिले आहेत. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही. २०१३ साली हेच गृहस्थ उभे होते बिल्ला घालून”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांवर केला.

“जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत पाया पडले होते. तुमचे आशीर्वाद ही शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही. मित्रांना मान नाही. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले असं म्हणत असतील तर २०१४ साली शिवसेनेशी युती का तोडली होती? एकनाथ खडसे नाशिमध्येच सांगितलं आहे, २०१४ मेपर्यंत आ गले लग जा. मला दिल्लीत बोलावलं होतं. राष्ट्रपतींच्या पत्रावर सही करायला. तोपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी होती. नंतर जुन ते ऑक्टोबर असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडली. आजही ती व्यक्ती जिवंत आहे. भाजपमधील ती जबाबदार व्यक्ती आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता?

“भाजपने २०१४ मध्ये युती तोडली. शिवसेनेने कुणाच्याही मदतीशिवाय ६३ आमदार निवडून आले. हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्षनेते होते. तेव्हा ती व्यक्ती आली आणि म्हणाली, उद्धव मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हटलं का? तर म्हणाले, दिल्लीत अशी चर्चा होती. आता बाळासाहेब राहिले नाही (बघा किती हरामी लोकं आहेत) त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे. २०१४मध्ये दिल्लीत असा विचार सुरू होता आता बाळासाहेब राहिले नाही. उद्धव ठाकरे काही करू शकत नाही आणि शिवसैनिक उद्धव सोबत जाणार नाहीत. आता वेळ आलीय शिवसेनेला संपवायचा”, असं ठाकरे म्हणाले.

“शिवसेनेचे पाच किंवा १० सीट येतील. पण तू कमाल केली. तू ६३ जागा आल्या. दिल्ली तुला आता घाबरतेय. २०१४साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं. काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता. राम एकवचनी होते. सत्यवचनी होते. मी आईवडिलांची शपथ घेऊन सांगितलं अमित शाह यांनी वचन मोडलं. नाही पाळलं त्यांनी. वचन मोडूनही तुम्ही स्वतला रामभक्त समजता. वचन मोडलं नसतं तर आज फडणवीस अर्धा नव्हे पाव मुख्यमंत्री झालेत आता ते अडीच वर्ष पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. काय फरक पडला असता. तुम्ही जी फोडाफोडी केली. आज ही ताकद तुमच्यासोबत राहिली असती. आज तुम्हाला वारंवार महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती. तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.