मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती, म्हणून त्यांनी… रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

आता पूलाखालून पाणी खाली गेलंय. आता विषय संपला आहे. मात्र बूटाचे वक्तव्य ते करत होते, तेव्हा त्यांना भान नव्हतं. उद्धवजींनी टोकाची भूमिका घेतली. अगदी मुख्यमंत्र्यांना ते इतक्या वाईट पद्धतीने बोलले, ते योग्य नव्हतं, असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती, म्हणून त्यांनी... रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट
ramdas kadamImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 8:35 PM

शिंदे गटाचे नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मोठं विधान केलं आहे. मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती. त्यामुळेच त्यांनी मी मागितलेला मतदारसंघ मला दिलं नाही. मला दुसरा मतदारसंघ देऊन पाडलं; असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यासहीत नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कारवाया केल्याचा धक्कादायक आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना रामदास कदम यांनी आज तोफच डागली.

बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री बनवतील अशी भीती उद्धव ठाकरे यांना होती. म्हणून उद्धव ठाकरेंनी मला मुद्दाम गुहागरला उभं केलं आणि पाडलं. मी दापोली मतदारसंघ मागितला होता. मात्र काही नेत्यांना सांगून, राजकारण करून उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. उद्धव ठाकरे यांच्या या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळेच आज शिवसेना फुटली आहे, असा घणाघाती हल्लाच रामदास कदम यांनी चढवला.

विरोधी पक्षनेता करण्याला विरोध

विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मला देण्यात आली होती. पण मी विरोधी पक्षनेता व्हावा हे उद्धव ठाकरे यांच्या मनात नव्हतं. त्यामुळेच त्यांनी शेवटपर्यंत मला पत्र देणार नाही, अशीच भूमिका घेतली होती. गजानन कीर्तिकर या गोष्टीला साक्षीदार आहेत. त्यावेळी मनोहर जोशीही तिथेच उपस्थित होते. शेवटी बाळासाहेबांनी सांगितल्यावर मला विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचं पत्र दिलं गेलं. जे काही दिलं ते मला बाळासाहेबांनीच दिलं. एखादं खातं द्यायचं आणि बाजूला बसवायचं हे उद्धव ठाकरे यांचं धोरण होतं, असा आरोपच रामदास कदम यांनी केला.

इसने शिवसेना बचायी है

मी कोकणात येऊ नये म्हणूनच उद्धव ठाकरे मला मराठवाड्याचा पालकमंत्री बनवत होते. नारायण राणे दुसऱ्या पक्षात गेल्यावर बाळासाहेब मला त्यांच्या गाडीत घेऊन जायचे. एकदा राहुल बजाज बसले होते. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं की, इसको पहचानते हो ये कौन है? राज ठाकरे और नारायण राणे जाने के बाद इसीने मेरी शिवसेना बचायी है. ते बाळासाहेब कुठे आणि उद्धव ठाकरे कुठे? असा सवालच त्यांनी केला.

आयत्या बिळावरचे नागोबा

बाळासाहेबांचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांना आयती गादी मिळाली आहे. त्यांनी केसेस अंगावर घेतल्या नाही. आयत्या बिळावर नागोबा झाले. त्यांनी नेहमी मराठी माणसात फूट पाडण्याचं काम केलं. आम्हालाच बाजूला व्हायला भाग पाडलं. आज ते काँग्रेसचे पाय चाटत आहेत. आम्ही तर शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत, असं ते म्हणाले.

पवार कोपऱ्यात फेकून देतील

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळेच नारायण राणे मुख्यमंत्री होईल म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. रामदास कदम मुख्यमंत्री होईल म्हणून त्याला पाडलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईल म्हणून त्यांच्यावर अन्याय केला, असं सांगतानाच शरद पवारांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. पवार उद्धव ठाकरेंना कोणत्या कोपऱ्यात टाकतील हे त्यांना कळणारही नाही, असा दावाही त्यांनी केला. त्या उद्धव ठाकरेला कुठल्या कोपर्यात टाकतील ते त्यांना कळणार पण नाही

कुटुंबावर परिणाम होऊ नये

पवार कुटुंबावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण माझ्या मते राजकारणात जरी दोन भाग झाले असले तरी त्याचा परिणाम कुटुंबावर होऊ नये. कुटुंब फुटता कामा नये. ते एकत्र असलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.