AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा आवाज घुमणार? डेलकरांच्या प्रचारासाठी ठाकरे भाजपच्या गडात शड्डू ठोकण्याच्या तयारीत

सिल्वासा : खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. हाती शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेनेकडून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर आता डेलकर यांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा आवाज घुमणार? डेलकरांच्या प्रचारासाठी ठाकरे भाजपच्या गडात शड्डू ठोकण्याच्या तयारीत
कलाबेन डेलकर यांचा शिवसेनेत प्रवेश (फाईल फोटो)
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 1:40 PM
Share

सिल्वासा : खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. हाती शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेनेकडून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर आता डेलकर यांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादरा-नगर हवेलीला जाणार असल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. (Uddhav Thackeray will go to Dadra Nagar Haveli for Kalaben Delkar’s campaign)

या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकद लावणार आहे. या भागात ठाकरेंची सभा होणं ही फार मोठी ताकद आहे. त्याच ताकदीवर डेलकर कुटुंब आणि त्यांचे कार्यकर्ते जुलमी प्रशासनाशी संघर्ष करत आहेत. मला वाटतं की उद्धव ठाकरे इथे प्रचाराला येतील, असं संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. आमच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद आहे. शिवसेनेचे वातावरण आहे. मोहन डेलकरांनी 9 वेळा निवडणूक लढवली, ते 7 वेळा खासदार राहिले. मोहन डेलकर यांचे वडीलही इथे खासदार होते. ते पोर्तुगिजांविरोधात लढले, असं हे कुटुंब आहे, असं राऊत म्हणाले.

‘डेलकर कुटुंबाचा संरक्षणासाठी शिवसेनेत प्रवेश’

एका विशिष्ट परिस्थितीत मोहन डेलकर यांचा मृत्यू स्वीकारावा लागला. डेलकर कुटुंबाला संरक्षणासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागला. इथल्या राजकीय झुंडगिरी आणि गुंडगिरीपासून वाचण्यासाठी त्यांना शिवसेनेचा आधार घ्यावा लागला. डेलकरांचा इथे लोकांशी चांगला संवाद आहे, काम आहे. त्यामुळे शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर खातं उघडण्यासाठी ही पहिली संधी असल्याचं राऊत म्हणाले. डेलकर यांना शिवसेतून निवडणूक लढवावी वाटली. त्यांच्या कुटुंबियांकडून आणि समर्थकांकडून आग्रही मागणी होती. त्यांच्यावर अनेक राजकीय पक्षांकडून निवडणूक लढण्याबाबत दबाव होता. कारण, त्यांचे कुटुंब इथे ताकद आहे. भाजपकडूनही त्यांना विनंती होती. तरीही त्या शिवसेनेकडून लढत आहेत, असंही राऊतांनी सांगितलं.

‘डेलकर छळ करणाऱ्यांना शरण गेले नाहीत’

मोहन डेलकर यांचा इकडच्या राजकीय पक्ष आणि प्रशासनाने छळ केला. त्यांच्या समर्थकांचा छळ केला. त्या निराशेतून ते मृत्यूला सामोरे गेले. पण छळ करणाऱ्यांना शरण नाही गेले. त्यांच्या मृत्यूचे रहस्य त्यांनी चिट्ठीत लिहले. महाराष्ट्र सरकारने एक एसआयटी स्थापन केली आहे आणि ती तपास करीत आहे. एसआयटी इथे येऊन तपास करत असल्याची माहितीही राऊतांनी दिली.

ही कुठली लोकशाही आहे? राऊतांचा सवाल

डेलकर यांनी आत्महत्या केली त्या चिट्ठीत प्रशासकांचा उल्लेख आहे ना! दादरा – नगर हवेलीचे प्रशासन दहशतीच्या माध्यमातून काम करतेय. मुळात इथला प्रशासक हा आयएएस अधिकारी असतो. पण भाजपचे राज्य आल्याने इथे राजकीय माणसाची सोय लावली. गुजरात मंत्रिमंडळांत मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल मोदींच्या लाटेतही इथे निवडणूक लढले. लोकांनी नाकारले तरीही त्यांना इथे पाठवले हे घटनाबाह्य आहे. मनमानी आणि मस्तवालपणा इथे दिसतो. इथे आर्थिक उलाढाल आहे. टेंडरबाजी चालते. केंद्रशासित प्रदेश असल्यानं विचारायला कुणी नसतं. थेट गृहमंत्री पाहतात. प्रशासकाला अमर्याद अधिकार आहेत. तो लोकांना तुरुंगात टाकतो. इथे मला काल मराठी लोक भेटले, त्यात उद्योजकही आहेत. इथे डेलकर यांच्या बरोबर काम करताना आढळलो तर आमच्यावर बालंट आणतात. आमची दुकाने बंद करतात. कंत्राटे रद्द करतात, असं त्यांनी सांगितलं. ही कुठली लोकशाही आहे? असा सवालही राऊतांनी केलाय.

इतर बातम्या : 

पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!

Video : काल पवार म्हणाले, पंकजा मुंडे एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत, आता दिल्लीला जाता जाता पंकजांचं उत्तर

Uddhav Thackeray will go to Dadra Nagar Haveli for Kalaben Delkar’s campaign

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.