होय, मी काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर नाकारली; शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांचा खुलासा

मला काँग्रेसने विधानपरिषदेसाठी विचारलं होतं, असा खुलासा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला. (Urmila Matondkar Congress officer)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:20 PM, 1 Dec 2020
Urmila Matondkar Congress officer

मुंबई : “मला काँग्रेसने विधानपरिषदेसाठी विचारलं होतं. पद किंवा प्रतिष्ठेबद्दल कुठलीही तक्रार नव्हती. पण वेगळ्या कारणांमुळे मी काँग्रेसची विधनापरिषदेची ऑफर नाकारली,” असा खुलासा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर  (Urmila Matondkar) यांनी केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे काँग्रेसने विधानपरिषदेसाठी विचारलो असल्याचे मान्य केले. त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Urmila Matondkar on Congress VidhanParishad offer)

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी (1 डिसेंबर) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी पत्राकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाबद्दल त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना, त्यांनी काँग्रेसबद्दल कुठलीही तक्रार नाही. तसेच, कुठल्या पदाचाही मुद्दा नव्हता. माझ्या वेगळ्या कारणांमुळे मी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला, असे मातोंडकर म्हणाल्या. मात्र हे वेगळं कारण काय आहे, यावर भाष्य करणे त्यांनी टाळले.

काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली

उर्मिला मतोंडकर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. याविषयी बोलातना, “मला काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली. माझी त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. लोकसभा लढवताना प्रचार करताना ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. त्यामुळे मी निवडणूक हरले. माझी पक्षाबद्दल कुठलीही तक्रार नाही असेही त्या म्हणाल्या.

तसेच मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार होत्या. या कारणामुळे काँग्रेसबद्दल कुठलीही नकारात्मक गोष्ट समोर यावी अशी माझी अच्छा नव्हती. असेही त्यांनी सांगितलं. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्द्ल आदर असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात चांगले नेते असल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिला यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिला यांनी अवघ्या सहा महिन्यांत पक्षाला रामराम ठोकला होता. असं असलं तरी त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल कुठलीही तक्रार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Urmila Matondkar on Congress VidhanParishad offer)

संबंधित बातम्या :

राज्यपाल नियुक्त आमदार : सर्वात मोठा ट्विस्ट, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा

उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला रामराम, कारण…

Photo : बनारसी सिल्क साडी, गळ्यात साज, बाळासाहेबांना वंदन; उर्मिलाच्या हाती शिवबंधन!

(Urmila Matondkar on Congress VidhanParishad offer)