शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार : संजय राऊत

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान होण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहे," असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना (Sanjay raut exclusive interview) केलं.

शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार : संजय राऊत

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान होण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहे,” असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना (Sanjay raut exclusive interview) केलं. “शरद पवारांचे राजकारण त्यांना कळणार नाही. मी त्यांना जवळून पाहिलं. त्यांचा अनुभव मी घेतला आहे. या सर्व राजकारणामागे शरद पवार आहेत.” असेही राऊत ‘टीव्ही 9 मराठी’शी (Sanjay raut exclusive interview) बोलताना म्हणाले.

“शरद पवारांचे राजकारण देश आणि राज्यासाठी सकारात्मक राहिलं आहे. हे सगळं घडवण्यामागे शरद पवारांची मोठी भूमिका राहिली आहे. या नाट्याचा शेवट काय होईल, हे मला आधीच माहिती होत.” असेही संजय राऊत म्हणाले.

“आज जे घडतयं त्याचं नेपथ्य आणि दिग्दर्शन शरद पवार करतील. या सरकारचं नेतृत्व शिवसेना करणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत असणार आहे. आमच्याकडे 170 चा आकडा आहे. तो तुम्हाला दिसेल,” असेही संजय राऊत यावेळी (Sanjay raut exclusive interview) म्हणाले.

संजय राऊत यांना अजित पवार परत येतील याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “शरद पवार याबाबत सांगतील. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. पडद्यामागे बरचं काही घडत होतं आणि ते सिद्ध झालं.”

“महाविकासआघाडीच्या सरकारचे नेतृत्व शिवसेना करणार. सरकार स्थापनेचा दावा शिवसेनाच करणार. आमच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असणार. ते आम्हाला समर्थन करणार असल्याचेही संजय राऊत म्हणाले.”

“राजकारण काय भाजपला येत नाही, आम्हाला पण येते. आम्ही काय इथे गोट्या खेळत नाही. देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. यापुढे विरोधी पक्षात राहून त्यांनी काम करावं,” अशी टीकाही संजय राऊत यांनी (Sanjay raut exclusive interview) केली.

“महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही काम करणार. आम्हाला राज्य पुढे न्यायचं आहे. राज्यपालांच्या भूमिकेनंतर आमचा शपथविधी होईल. राज्यपाल कालपर्यंत भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. मात्र आता ते योग्य काम करतील,” असेही ते म्हणाले.

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं ही शरद पवारांची भूमिका आहे. महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्ष चांगल चालेलं. जी गोष्ट शिवसेनेला हवी असते ती गोष्ट आम्ही सिद्ध करतो,” असेही राऊत म्हणाले.

“शपथविधी शिवतीर्थावर व्हावं अशी आमची इच्छा आहे. तिथे आमचं भावनिक नात आहे असेही संजय राऊत म्हणाले. वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकरांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात (Sanjay raut exclusive interview) आली. याबाबत संजय राऊत यांनी विचारले असता ते म्हणाले. “कोळंबकरांचे कुळ आणि मूळ हे शिवसेनेतच आहे. त्यामुळे ते सत्यवादी पद्धतीने वागतील.”

देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणारच होता. त्यांनी माझ्यावर खूप खालच्या पातळीवर टीका केली. जे मी सांगत होतो. तेच आज झालं. तुम्ही स्थापन केलेलं सरकार बेईमानीचे सरकार होतं. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी खोट बोललात अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI