सुरु केलेल्या योजना भाजपच्या नाही, राज्याच्या भल्याच्या, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

सुरु केलेली काम ही भाजपच्या भल्याची नाहीत. तर त्या राज्याच्या भल्याच्या होत्या." असा टोला चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes shivsena) लगावला.

सुरु केलेल्या योजना भाजपच्या नाही, राज्याच्या भल्याच्या, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

औरंगाबाद : “राज्यात सुरु केलेल्या योजना भाजपच्या भल्याच्या नसून राज्याच्या भल्याच्या होत्या. असं सुडाचे राजकारण करु नये. त्यांचा जो काही पंगा आहे. आमच्या पक्षाशी आहे,” अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत (Chandrakant patil criticizes shivsena) आहे.

“नवीन सरकारने विकास कामांच्या योजना बंद करायला सुरुवात केली आहे. जवळपास 20-25 काम बंद केली आहेत. अनेक पाण्याच्या योजनाही बंद केल्या आहेत. सुरु केलेली काम ही भाजपच्या भल्याची नाहीत. तर त्या राज्याच्या भल्याच्या होत्या.” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes shivsena) लगावला.

“शिवसेना तत्त्व गुंडाळून सत्तेत आली. सर्वांना माहित असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लावला. आमचा पंगा शिवसेनेशी नाही. मात्र त्यांनी राष्ट्रवादीपासून सावध राहावं असा सल्ला पाटील यांनी शिवसेनेला दिला.”

“मतदारांनी आपल्या दोघांना मतदान दिल्याने इतक्या जागा मिळवणं शक्य झालं. हे शिवसेनेने लक्षात ठेवावं. राज्यातील विकास काम बंद केल्यावर लोक तुम्हाला काय पेढे देणार आहेत का?” असा प्रश्नही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes shivsena) विचारला.

“त्यांचा जो काही पंगा आहे. तो आमच्या पक्षाशी आहे. असं बोलत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. राज्यात सुडाचं राजकारण सुरु आहे. मराठा आणि कुणबी युवकांसाठी सुरु केलेली सारथी योजनांवर देखील सरकारने अनेक निर्बंध घातले. आतापर्यंत 500 जणांना या योजनेचा फायदा झाला आहे. अशाने सरकार राज्याच्या हिताचे काम करत नसल्याच दिसून येत असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI