इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिंदे-भाजप सरकारची मदत घेणार; संजय राऊत यांचं मोठं विधान

राज्यात आमचं सरकार नाही. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बैठक झाली. तिथे आमच्या घटक पक्षांचं सरकार होतं. इथे आमचं सरकार नाही. त्यामुळेही बैठक आमच्यासाठी निश्चितच एक टास्क आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिंदे-भाजप सरकारची मदत घेणार; संजय राऊत यांचं मोठं विधान
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 2:35 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत. तसेच अनेक महत्त्वाचे नेते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्य सरकारची मदत घेणार आहोत. राज्य सरकारची मदत आम्हाला लागेल. आमचे काही नेते राज्य सरकारशी संवाद साधून नेत्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न मार्गी लावतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना दिली.

आज वरळीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, सुभाष देसाई आणि इतर नेते उपस्थित होते. सुमारे दोन तास ही बैठक चालली. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीचा तपशील दिला.

हे सुद्धा वाचा

दोन दिवस बैठक

इंडिया आघाडीची आज बैठक झाली. पाटणा, बंगळुरूनंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ग्रँड हयातला ही बैठक होईल. 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी बैठक सुरू होईल. त्या दिवशी संध्यकाळी उद्धव ठाकरे यांनी डिनरचं आयोजन केलं आहे. 1 ऑगस्टला बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेकडे यजमानपद

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद शिवसेनेकडे आहे. काँग्रेस आणि शिवसेना आमच्यासोबत आहेत. आम्ही एकत्र काम करू, असं आजच्या बैठकीत ठरलं. बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येकाकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या. पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे ही बैठक यशस्वी होईल. पुढच्या कामाला आम्ही सुरुवात करू. बैठक यशस्वी करण्यावर सर्वांचं एकमत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारशी संवाद साधू

राज्यात आमचं सरकार नाही. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बैठक झाली. तिथे आमच्या घटक पक्षांचं सरकार होतं. इथे आमचं सरकार नाही. त्यामुळेही बैठक आमच्यासाठी निश्चितच एक टास्क आहे. किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत येणार आहेत. बिहार, तामिळनाडू, दिल्ली, बिहार झारखंडचे मुख्यमंत्री येणार आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसहीत अनेक बडे नेतेही येणार आहेत.

आम्ही सरकारशी संवाद साधू. आम्हाला राज्य सरकारच्या सहकार्याची गरज आहे. कारण एवढे नेते आल्यावर सुरक्षा व्यवस्थेचा ताण पडू शकतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू. आमचे काही नेते सरकारशी समन्वय करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.