AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : गणेश विसर्जन मिरवणूकीत चंद्रकांत दादा अन् आदित्य ठाकरे एकत्र, नेमके पुण्यात घडले तरी काय?

मुंबईनंतर आदित्य ठाकरे यांनी पुणे येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने दगडुशेठ हलवाई, कसबा गणपती यांचा समावेश होता. आदित्य ठाकरे दाखल होताच तरुणांनी एकच जल्लोष केला. शिवाय मंडळाच्या मिरवणूकीत त्यांनी सहभाग घेताच तरुणांचा उत्साह शिगेला पोहचला जात होता.

Pune : गणेश विसर्जन मिरवणूकीत चंद्रकांत दादा अन् आदित्य ठाकरे एकत्र, नेमके पुण्यात घडले तरी काय?
आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील
| Updated on: Sep 09, 2022 | 5:23 PM
Share

पुणे : राज्यातील (Political differences) राजकीय मतभेद किती टोकाला गेले आहेत, हे नव्याने सांगायची गरज नाही. असे असले तरी सार्वजनिक कार्यक्रमात हेच नेते समोरासमोर आले तर एकमेकांबद्दल आदरयुक्त भावना हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. असाच काहीसा प्रकार पुण्याच घडला आहे आणि निमित्त ते गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीचे. राज्यात यंदा गणेश विसर्जनाचा उत्साह काही वेगळाच आहे. याच गणेश भक्तांच्या उत्साहात सहभाग नोंदवला आहे तो राजकीय नेत्यांनीही. त्याचे झाले असे, येथील कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान, भाजपाचे (Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील आणि (Aaditya Thackeray) शिवसेनेचे आ. आदित्य ठाकरे तिथे पोहचले. यावेळी एकमेकांना पाठ न दाखवता त्या दोघांनी मात्र, गणपतीची पालखी खांद्यावर घेतली.

नेमका तो प्रसंग काय ?

मुंबईप्रमाणेच पुण्यात देखील गणेश विसर्जन मिरवणूका मोठ्या उत्साहात पार पडतात. येथील कसबा सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरु होतानाच भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि आ. आदित्य ठाकरे हे दाखल झाले होते. आता दोघेच एकाच वेळी म्हटल्यावर काय होणार असा प्रश्न काही क्षणापुरता पडला होता पण या दोघांनीही एकत्र येऊन गणपतीची पालखी खांद्यावर घेत, गणरायाचा जयघोष केला. त्यामुळे राजकारणात काही का असेना पण सार्वजनिक कार्यक्रमात आल्यावर सर्व मतभेद हे बाजूला ठेवले जातात याचेच दर्शन त्या दोघांनी घडवून आणले.

आदित्य ठाकरेंच्या मंडळांना भेटी

मुंबईनंतर आदित्य ठाकरे यांनी पुणे येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने दगडुशेठ हलवाई, कसबा गणपती यांचा समावेश होता. आदित्य ठाकरे दाखल होताच तरुणांनी एकच जल्लोष केला. शिवाय मंडळाच्या मिरवणूकीत त्यांनी सहभाग घेताच तरुणांचा उत्साह शिगेला पोहचला जात होता. एवढेच नाहीतर सेल्फी घेण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी त्यांना गराडा घातला होता.

पुण्यात 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणरायाला शांततेत निरोप देण्यासाठी पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. पुण्यात 3 हजार सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. शहरात सर्वत्र शांततेत मिरवणूका आणि विसर्जन होण्याच्या दृष्टीने 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.