‘मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस’, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांचा घणाघात

काँग्रेसकडून नंदुरबारमध्ये आयोजित व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन यशोमती ठाकूर यांनी केंद्र आणि मोदींवर जोरदार टीका केलीय. यावेळी यशोमती ठाकूर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

'मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस', काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

नंदुरबार : महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे. भगवा ही कुणा एका पक्षाची जहागीर नाही. मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसकडून नंदुरबारमध्ये आयोजित व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन यशोमती ठाकूर यांनी केंद्र आणि मोदींवर जोरदार टीका केलीय. यावेळी यशोमती ठाकूर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. (Minister Yashomati Thakur criticizes PM Narendra Modi)

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्तानं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्याकडून नंदुरबारमध्ये व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नंदुरबारमधील शहीद शिरीष कुमार आणि त्याच्या साथिदारांना अभिवादन करुन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार मंत्री यशोमती ठाकूर आणि मंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रमाला काँग्रेसचे मंत्री तब्बल दोन तास उशीरा पोहोचल्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

‘शिक्षणाची ओढ असल्यासही प्रतिकूल परिस्थितीत यश मिळतं’

राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 12 वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या बालकांचे कौतुक केले आहे.

राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना (चाईल्ड इन कॉन्फ्लि क्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते.

अनाथ, निराधार बालके. एक पालक असलेली, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मदेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त / बाधित बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले आणि प्रमाणित केलेले शाळेत न जाणारे बाल कामगार आदींना बालगृहात ठेवले जाते. या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षण यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

इतर बातम्या :

यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी यशस्वी, अमरावतीत 48 तरुणांची नोकरी वाचवली

‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’, यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला

Minister Yashomati Thakur criticizes PM Narendra Modi

Published On - 2:28 pm, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI