कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जामीन द्या, मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरचा अर्ज, कोर्टाकडून मंजुरी

कोरोनाबाधितांची सेवा करण्याच्या अटीवर मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जामीन द्या, मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरचा अर्ज, कोर्टाकडून मंजुरी

पुणे : कोरोनाबाधितांची सेवा करण्याच्या अटीवर (Mocca Crime Doctor Granted Bail) मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरला जामीन मंजूर करण्यात आला आहे. येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या डॉक्‍टर इंद्रकुमार भिसेला जामीन मिळाला आहे. खंडणीप्रकरणी भिसे गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. भिसेने कोव्हिड रुग्णांची सेवा करण्यासाठी जामीन अर्ज केला (Mocca Crime Doctor Granted Bail) होता.

पुणे सत्र न्यायालयात जामीन अर्जावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने 30 मे रोजी जामीन मंजूर केला.

डॉ. भिसेला 25 हजाराच्या बॉण्डवर दोन महिन्याचा जामीन देण्यात आला आहे. ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांवर आठवड्यात पाच दिवस सेवा करण्याची अट आहे. साक्षीदारांवर दबाव टाकू नये, मुदत संपण्यापूर्वी कारागृहात हजार व्हावं, असं निर्देश त्याला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कारागृहात हजर होताना ससून अधिक्षकांचं प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे (Mocca Crime Doctor Granted Bail).

30 कोटी खंडणी प्रकरणी भिसेची जेलमध्ये रवानगी

राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास मंडळाच्या अध्यक्षच्या 30 कोटी खंडणी प्रकरणी भिसेची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. डॉ. भिसे चार साथीदारांसह मे 2019 मध्ये ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.

भिसे स्त्रीरोग तज्ज्ञ असून यापूर्वी ते वैद्यकीय उपचार करत होते. त्यामुळे डॉक्टर भिसेच्या अर्जानंतर न्यायालयाने सध्याची परिस्थिती पाहून निर्णय घेतला आहे (Mocca Crime Doctor Granted Bail).

संबंधित बातम्या :

दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर, महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय

Pune Corona | जनता वसाहतीत तीन दिवसात 22 कोरोना रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार पार, चौथ्या लॉकडाऊनची शिथीलता कोरोनाच्या पथ्यावर!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *