AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईहून पुण्याला परतलेल्या 4 एसआरपीएफ जवानांना कोरोना, 96 जवान क्वारंटाईन

पुण्याच्या ग्रुप दोनच्या 100 एसआरपीएफ जवानांची तुकडी दोन महिन्यांपूर्वी मुंबईत बंदोबस्ताला गेली होती. जवानांची ही तुकडी सोमवारी पुण्यात परतली.

मुंबईहून पुण्याला परतलेल्या 4 एसआरपीएफ जवानांना कोरोना, 96 जवान क्वारंटाईन
| Updated on: Apr 24, 2020 | 12:20 PM
Share

पुणे : पुण्यात एसआरपीएफच्या 4 जवानांना कोरोनाची लागण (SRPF Javans Infected By Corona ) झाल्याची धक्कादायक माहिती आहे. गेल्या बुधवारी तिघांना तर गुरुवारी एकाला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. या पार्श्वभूमीवर 96 जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एसआरपीएफ जवानांनाच कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात एकच खळबळ (SRPF Javans Infected By Corona) उडाली आहे.

पुण्यातील ग्रुप दोनच्या 100 एसआरपीएफ जवानांची तुकडी दोन महिन्यांपूर्वी मुंबईत बंदोबस्ताला गेली होती. जवानांची ही तुकडी सोमवारी पुण्यात परतली. पुण्यात आल्यानंतर काही जवानांनी सर्दी, खोकल्यासह कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यानंतर या जवानांची कोविड-19 चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी अहवालात 4 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

सध्या या चारही जवानांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवानांनी तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली, तर इतर 96 जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, हे जवानसोबतच राहात असल्याने जवानांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका (SRPF Javans Infected By Corona ) वाढला आहे.

पुण्यात पुढील तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 1500 वर जाण्याची शक्यता

पुण्यात पुढच्या तीन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 1,500 वर तर 15 मेपर्यंत 3,000 वर जाण्याशी शक्यता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तवली आहे. मात्र, तरीही इतर शहरांच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. मॅथेमॅटिक मॉडेलप्रमाणे अपेक्षित तेवढे रुग्ण वाढलेले नाहीत, असं आयुक्त म्हणाले.

पुण्यात एका दिवसात ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण

पुण्यात काल दिवसभरात (23 एप्रिल) ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या सव्वा महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात शंभरहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 876 वर गेली आहे. (Pune Maximum Corona Patients in a day) राज्यात काल तब्बल 778 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 427 वर गेली आहे.

SRPF Javans Infected By Corona

संबंधित बातम्या :

पुण्यात एका दिवसात ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण, चार वॉर्डमध्ये शंभरीपार, कोणत्या प्रभागात किती?

गुड न्यूज! बीड जिल्हा कोरोनामुक्त, आष्टीतील एकमेव कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह

नर्सच्या कुटुंबातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग, नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 97 वर

राज्यात तब्बल 778 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 वर

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.