पुणेकरांकडून निर्बंधांना फाटा, पोलिसांकडून 2 हजार 804 कारवाया, एक हजार 73 वाहने जप्त

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात लागू करण्यात आलेल्या अतिरिक्त निर्बंधांना काही पुणेकरांनी फाट्यावर मारलं आहे. मात्र पुणे पोलिसांनी देखील या मुजोरपणाला सडेतोड उत्तर दिलं आहे (Pune police take action against citizens amid lockdown).

पुणेकरांकडून निर्बंधांना फाटा, पोलिसांकडून 2 हजार 804 कारवाया, एक हजार 73 वाहने जप्त

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात लागू करण्यात आलेल्या अतिरिक्त निर्बंधांना काही पुणेकरांनी फाट्यावर मारलं आहे. मात्र पुणे पोलिसांनी देखील या मुजोरपणाला सडेतोड उत्तर दिलं आहे (Pune police take action against citizens amid lockdown). पोलिसांनी तब्बल 2 हजार 804 कारवाया केल्या आहेत. यात कलम 188 अंतर्गत 510 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 73 वाहनं जप्त करण्यात आले. या व्यतिरिक्त 970 नागरिकांना नोटीस बजावली, तर मॉर्निंग करणाऱ्या 207 जणांवर कारवाई देखील कारवाई करण्यात आली.

पुण्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त निर्बंध घातले आहेत. 22 एप्रिलला सकाळी 6 वाजल्यापासून 23 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संबंधित निर्बंध होते. मात्र अनेक पुणेकरांनी या अतिरिक्त निर्बंधांनाही फाट्यावर मारल्याचं पाहायला मिळालं. एकीकडं कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतो आहे. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. दुसरीकडे अशा स्थितीतही काही पुणेकर बेफिकीरपणे वर्तन करत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये हे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, पुण्यात 23 एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल 104 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच चौघा कोरोनाग्रस्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात एकूण रुग्णांचा आकडा 876 वर गेला आहे, तर मृत्यूनं साठी गाठली आहे. पुण्यात एकाच दिवसात नवीन रुग्णांनी शंभरी पार केल्यानं कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसतो आहे.

चार मृत्यूंपैकी दोन मृत्यू ससून रुग्णालयात आणि आणखी दोन मृत्यू इतर रुग्णालयांमध्ये झाले. यात 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. अद्याप पुण्यात 36 कोरोना रुग्णांची स्थिती नाजूक आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असं असलं तरी काही कोरोना रुग्ण कोरोनावर मात करताना देखील दिसत आहेत. आज 8 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत 130 रुग्णांना घरी सोडण्यात आलं, तर 864 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना दणका, 39 दुकानदारांवर गुन्हे, 87 निलंबित, 48 दुकानांचे परवाने रद्द

नर्सच्या कुटुंबातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग, नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 97 वर

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा, उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला आदेश

यवतमाळ शहरात पुढील तीन दिवस कडकडीत बंद, दूध, पेट्रोल ठराविक वेळेतच मिळणार

Pune police take action against citizens amid lockdown

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *