4 अशा राशीचे लोक, जे दुतोंडी असतात, विश्वासघातकी असतात, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

4 अशा राशीचे लोक, जे दुतोंडी असतात, विश्वासघातकी असतात, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल
Rashifal

दुतोंडी लोक वास्तववादी आणि इमानदार असणं मोठं कठिण असतं. त्यांना खोटेपणाची आणि दांभिकपणाची सवय असते. असे लोक जीवनाप्रती वास्तववादी नसतात.

Akshay Adhav

|

May 30, 2021 | 8:28 AM

मुंबई : जे लोक दुतोंडी असतात आणि बेईमान असतात असे लोक वास्तववादी असणं मोठं कठिण. दांभिकता हा अशा लोकांचा दागिना असतो. ते बोलायला गोड असतात, वागायलाही छान छान वाटतात पण प्रत्यक्षात ते तसे नसतात. प्रत्यक्षात ते तोडफोड करणारे, चालाक, धूर्त असतात.दुतोंडी लोकांचा खोटारडेपणा सहज पकडता येत नाही. (4 people With Zodiac sign who are faced and unfaithful)

ती गोष्टच अशा पद्धतीनं करतात की ती खरीही वाटते आणि प्रत्यक्षात खोटीही असते. पण त्यांचा शब्द पकडता येत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार अशा 4 राशीचे लोक आहेत, ज्यांच्यावर विश्वास टाकणं महागात पडू शकतं. त्या चार राशी कोणत्या? नजर टाकुया.

1. मिथून राशी

मिथून राशीचे लोक हे सर्वात नकली राशींपैकी एक आहेत. हे लोक असे असतात की, ते मधमाशीलाही ठेच पोहोचवत नाहीत इतके ते काळजी करताना दिसतात पण प्रत्यक्षात विषारी असतात. ते खोटेपणा पसरवतात. पाठीत सुरा खुपसतात. लोकांच्या पाठीमागं कुजबूज करतात.

2. वृश्चिक राशी

ह्या राशीचे लोक महत्वाकांक्षी असतात. आपलं साध्य प्राप्त करण्यासाठी ते कुठल्याही स्तराला जातात. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी ते तथ्याशी छेडछाड करतात, एखाद्याचा छळही करतात. हे दुतोंडी असतात. लोकांसमोर एक आणि पाठीमागं दुसरच बोलतात. आपण कसे हाणीकारक नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, प्रत्यक्षात ते हाणी पोहोचवतात.

3.धनू राशी

ह्या राशीच्या लोकांना संघर्ष आवडत नाही. एखादं संकट आलं, भांडण झालं तर ते त्याचा सामना करु शकत नाहीत. त्यातून वाचण्यासाठी ते मग नकली बनतात, बनाव रचतात. ह्या राशीचे लोक इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांच्या गुड बुक्समध्ये रहाण्यासाठी खोटी स्तुती करतात.

4. मीन राशी मीन राशीच्या लोकांमध्ये द्वेषभावना नसते पण तरीही ते नकली बनतात. ह्या राशीचे लोक एखाद्याच्या चेहऱ्यासमोर टीका करत नाहीत किंवा करु शकत नाहीत. समोर ते एखादी गोष्ट हसत खेळत करतात पण प्रत्यक्षात ते त्या गोष्टीचा तिरस्कार करतात. ते एखाद्यासमोर स्वार्थी नाहीत होऊ शकत पण शेवटी ते दुतोंडी आणि दांभिक होतात.

(4 people With Zodiac sign who are faced and unfaithful)

हे ही वाचा :

‘या’ राशीच्या व्यक्तींना आवडते थाटामाटात ग्रँड लग्न, पाण्यासारखा खर्च करतात पैसा

Weekly Horoscope 30 May–5 June, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, जाणून घ्या 30 मे ते 5 जूनपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य

Horoscope 29th May 2021 | मीन राशीला मेहनतीचे फळ मिळेल, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें