AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Angarak Yog 2022: रक्षाबंधनाला जुळून येतोय अंगारक योग, कोणत्या राशींवर होणार परिणाम

अंगारक योग नावानेच आपल्याला कळते ही हा योग अग्निचा कारक आहे. कुंडलीत हा योग बनल्या नंतर व्यक्ती क्रोध आणि निर्णय क्षमतेवरचा ताबा हरवून बसतो. अंगारक योगामुळे मुख्यता क्रोध,अग्निभय, दुर्घटना, रक्ता संबंधित आजार आणि त्वचे संबंधित समस्या होतात.

Angarak Yog 2022: रक्षाबंधनाला जुळून येतोय अंगारक योग, कोणत्या राशींवर होणार परिणाम
अंगारक योग Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 04, 2022 | 3:06 PM
Share

भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन (Rakshabandhan 2022) लवकरच येत आहे. या वर्षी रक्षाबंधन सणावर मंगळ आणि राहू अशुभ संयोग निर्माण करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि राहू अंगारक योग (Angarak Yog 2022) नावाचा अशुभ योग तयार करत आहेत. अंगारक योग 10 ऑगस्टपर्यंत मेष राशीत (zodiac signs) राहील आणि दुसऱ्या दिवशी 11 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आहे. जेव्हा कुंडलीत राहु अथवा केतु पैकी कुठल्या एका ग्रहा बरोबर मंगळ ग्रहाचा संबंध बनतो त्या कुंडलीत अंगारक योग उत्पन्न होतो. कुंडलीत अंगारक योगाचे अशुभ फळ तेव्हा प्राप्त होतात जेव्हा हा योग निर्माण करणारे मंगळ, राहु, किंवा केतु दोन्ही अशुभ भावात असतील. याच्या अतिरिक्त जर कुंडलीत मंगळ, राहु, किंवा केतु दोन्ही शुभ भावात असतील तर व्यक्तीच्या जीवना वर अधिक नकारात्मक प्रभाव पडत नाही.

प्रभावित व्यक्ती-

अंगारक योग याची ओळख व्यक्तीच्या वागणुकी द्वारे केली जाते. या योगाच्या प्रभावात व्यक्ती खूप रागीष्ट बनतो. अशी व्यक्ती कुठला ही निर्णय घेण्यात असक्षम असते परंतु ती न्यायप्रिय असते. स्वभावाणी ही लोकं सहयोगी असतात. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्ती सरकारी पदावर नियुक्त अथवा प्रशासनिक अभिकर्ता बनतो.

प्रभाव-

अंगारक योग नावानेच आपल्याला कळते ही हा योग अग्निचा कारक आहे. कुंडलीत हा योग बनल्या नंतर व्यक्ती क्रोध आणि निर्णय क्षमतेवरचा ताबा हरवून बसतो. अंगारक योगामुळे मुख्यता क्रोध,अग्निभय, दुर्घटना, रक्ता संबंधित आजार आणि त्वचे संबंधित समस्या होतात.

अंगारक योग शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे फळ देणारा असतो. कुंडलीत हा योग निर्माण झाल्यानंतर व्यक्ती आपल्या परिश्रमाने नाव आणि पैसा कमवतो. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात.

अंगारक योगात या राशींना राहावे लागेल सतर्क

  1. मेष- मेष राशीत राहू आणि मंगळाच्या संयोगामुळे रक्षाबंधनाला अंगारक योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांनी रक्षाबंधनाच्या सणापर्यंत आपला रागावर संयम ठेवावा. या काळात कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या.
  2. वृषभ- अंगारक योगात वाहन अपघाताची शक्यता वाढते, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहार अडकू शकतात. व्यवसायात आर्थिक नुकसानही होऊ शकते.
  3. कर्क- मंगळ आणि राहूच्या संयोगाने तयार होणारा अंगारक योग देखील कर्क राशीच्या लोकांसाठी अशुभ असू शकतो. अंगारक योगामुळे राग आणि बोलणे अनियंत्रित होऊ शकते. वाहन जपून चालवा. घाईत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे.
  4. तूळ- तूळ राशीच्या लोकांवर अंगारक योगाचे दुष्परिणाम संभवतो. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी वाद झाल्यानंतर काही दिवस घरात अशांतता राहील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.