Bedroom Vastu Tips : नवरा-बायकोमध्ये सतत होतात भांडणे? बेडरूममधून या गोष्टी आजच करा बाहेर
काही लोकांना असे वाटते की बेडरूममध्ये प्रेमाचे चिन्ह म्हणून शोपीस किंवा ताजमहालचे चित्र लावल्याने परस्पर प्रेम संबंधात गोडवा वाढेल. पण हा तुमचा गैरसमज आहे.

मुंबई, जोडप्यांसाठी बेडरूमचे महत्त्व विशेष आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोषामुळे (Bedroom Vastu Tips) तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊन आपापसात भांडणे होतात. म्हणूनच बेडरुम वास्तुदोषांपासून मुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. बेडरूममध्ये अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. ज्यामुळे पती पत्नीमध्ये सतत भांडणं, मतभेद, आरोग्याच्या समस्यांना समोर जावे लागते. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या बेडरूममधून लगेच काढून टाकल्या पाहिजेत. ज्यामुळे पती पत्नीचे नाते मजबुत होईल.
देवाचा फोटो
तुमच्या बेडरूममध्ये चुकूनही देवाचे फोटो लावू नका. शयनकक्ष पती-पत्नीमधील नातेसंबंध दर्शविते, म्हणजेच ज्योतिषशास्त्रात ते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे जिथे शुक्र आहे तिथे देवतांची म्हणजेच गुरु ग्रहाची उपस्थिती अशुभ मानली जाते. बृहस्पती हा शुक्राचा विरोध करणाऱ्या देवतांचा गुरू मानला जातो, त्यामुळे दोघांनाही एकत्र ठेवता येत नाही.
इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स
ज्योतिषशास्त्रातील इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर राहू आणि शनीचा प्रभाव असल्याचे मानले जाते. या अशुभ ग्रहांमुळे त्यांना बेडरूममध्ये ठेवल्याने तुमच्या वैवाहिक जीवनावरही अशुभ प्रभाव पडतो. म्हणूनच तुमच्या खोलीत किमान इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ठेवा. यामुळे तुमच्या प्रेमसंबंधात दुरावा निर्माण होईल.
चुकूनही लावू नका अशा प्रकारचे फोटो
काही लोकांना असे वाटते की बेडरूममध्ये प्रेमाचे चिन्ह म्हणून शोपीस किंवा ताजमहालचे चित्र लावल्याने परस्पर प्रेम संबंधात गोडवा वाढेल. पण हा तुमचा गैरसमज आहे. वास्तविक ताजमहाल ही एक थडगी आहे आणि आपल्या खोलीत थडग्याचे चित्र लावणे योग्य नाही. म्हणूनच चुकूनही ताजमहालला तुमच्या खोलीत कोणत्याही स्वरूपात जागा देऊ नका.
आतापर्यंत आपण बेडरूममध्ये काय नसावे हे पाहिले तसेच आता आपण काय असावे हे पाहणार आहोत. बेडरूममध्ये सुगंधी मेणबत्ती किंवा मंद सुगंध सतत दरवळत असेल तर नवरा-बायकोमधील संबंध सुधारण्यास मदत होते तसेच परस्परांमधले प्रेम वाढते. बेडरूममध्ये खिडकी असावी. कारण त्यामुळे जोडप्यातील तणाव कमी होतो आणि नात्यात प्रेम टिकून राहते. यामुळे आपल्या बेडरूमला खिडकी असणे खूप आवश्यक आहे.
बेडरूममध्ये आरसा ठेवावा यामुळे पती-पत्नीमधील दुरावा कमी होऊन त्यांच्यातील प्रेम वाढते. पत्नीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावे आणि मोठी उशी वापरावी. त्यामुळे त्यांच्यातील परस्पर प्रेम वाढते. पती-पत्नी ज्या खोलीत झोपतात. त्या खोलीचा रंग हलका गुलाबी किंवा हलका हिरवा असावा. गडद रंग कधीही वापरू नका. हलका गुलाबी आणि हलका हिरवा रंग आनंददायी मानला जातो. हे रंग तणाव कमी करण्यास आणि जोडीदाराला जवळ आणण्यास मदत करतात. वास्तूनुसार मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. कारण ते शुक्राचे प्रतीक आहे. त्यामुळे पती-पत्नीचे नाते मधुर होऊन त्यांच्यात प्रेम वाढते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
