मार्च महिन्यात ग्रहांची उलथापालथ, 30 वर्षानंतर असं काही घडणार असल्याने या राशीचे धाबे दणाणले
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलली की मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर त्याचे परिणाम दिसून येतात. 30 वर्षानंतर राशीचक्रात मोठी घडामोड घडणार आहे. मार्च महिन्यात सूर्य आणि शनि राशी बदल करणार आहेत. तर शुक्र आणि बुधाच्या स्थितीतही बदल होणार आहे. यामुळे काही राशींचं भलं होणार आहे. तर काही राशींचं टेन्शन वाढणार आहे.

पंचांगानुसार, मार्च महिना हा ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात बरेच ग्रह राशी बदल करणार आहेत खासकरून शनिच्या गोचरामुळे राशीचक्रावर प्रभाव पडणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह राशी बदल करणार आहे. तर 15 मार्चला बुद्धीदाता आणि ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशीबदल करणार आहे. तसेच 30 वर्षानंतर मीन राशीत शनी आणि सूर्याची युती होणार आहे. सूर्यदेव 14 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. तर शनिदेव 29 मार्चला या राशीत अडीच वर्षासाठी ठाण मांडून बसणार आहेत. त्यामुळे ग्रहांची ही उलथापालथ काही राशीच्या पथ्यावर तर राशींना टेन्शन घेऊन येणारी आहे. शनिदेव मीन राशीत येणार असल्याने या राशीच्या जातकांचं टेन्शन वाढणार आहे. तसेच मेष राशीला साडेसातीच्या पहिल्या टप्प्यातून जावं लागणार आहे. शनिदेव या कालावधीत जातकांचा अहंकार पूर्णपणे मोडून टाकतात, असं सांगितलं जातं. त्यामुळे या राशीच्या जातकांनी डोकं शांत ठेवून आपल्या हातून मोठी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच शनि महाराजांना शरण जावं.
या राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मिथुन : या राशीच्या जातकांना मार्च महिना चांगला जाणार आहे. कारण शनि आणि सूर्यदेव या राशीच्या कर्मस्थानात गोचर करणार आहेत. यामुळे तुम्हाला उद्योगधंद्यात यश मिळेल. तसेच तुमच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळेल. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी होताना दिसतील. पण शनि आणि सूर्य या पितापुत्रांचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे या काळावधीत मुलगा किंवा वडिलांशी वाद होऊ शकतो.
कर्क : या राशीच्या जातकांवर शनिदेवांची विशेष कृपा असणार आहे. शनिदेवांनी गोचर करताच अडीचकीपासून मुक्ती मिळणार आहे. तर शनि आणि सूर्याची युती नवव्या स्थानी होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. इच्छित ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळू शकते. तसेच उत्पन्नातही वाढ होऊ शकते. विदेशात यात्रा करण्याची संधी मिळेल.
कुंभ : या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा असणार आहे. म्हणजेच या राशीच्या धन स्थानात शनि आणि सूर्याची युती होणार आहे. यामुले जातकाला कुठूनतरी अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेली कामं पू्र्ण होऊ शकतात. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना या काळात लाभ मिळू शकतो. या कालावधीत नव्या लोकांशी गाठीभेटी होती. एकंदरीत काय तर शनिदेव शेवटच्या टप्प्यात काहीतरी देऊन जातील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
