Horoscope 14 May 2022: ‘या’ राशींच्या लोकांनी अहंकार कमी करावा, प्रवास टाळा

Horoscope 14 May 2022: 'या' राशींच्या लोकांनी अहंकार कमी करावा, प्रवास टाळा

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 14, 2022 | 5:05 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

कर्क –

मानसिक सुख शांति राहील. कामं वेळेवर पूर्ण होतील त्याने समाधान लाभेल. मनात चाललेला गोंधळ कमी होईल. विद्यार्थी तसंच युवकांचा त्यांच्या मित्रांसोबत तसंच गुरुंच्या सानिध्यात वेळ जाईल. पण, हे लक्षात ठेवा जी कामं तुम्हाला साधी आणि सहज वाटत आहेत. त्यात अडचणी येतील. नकारात्मक विचारांमुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जात आहात. दिवसातील काही वेळ चिंतन मनन करण्यात घालवा. फायनान्स तसंच आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. सरकारी कामाच्या बाबतीत सफलता मिळेल. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात चांगले परिणाम मिळतील. नोकरीत बॉस आणि अधिकारी तुमच्या कामाने संतुष्ट असतील.

लव फोकस – कामाच्या व्यापातून घरासाठी वेळ काढ. घरात कोणतंतरी शुभ कार्य होण्याची शक्यता.

खबरदारी – साथीच्या आजारपणा पासून सावधान. सध्या तुमची प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे.

शुभ रंग – ऑंरेज

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 8

सिंह –

दिनक्रमात काहीतरी नाविन्य आणाल. ज्यात कुटूंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. संपत्ती संबंधी विवाद कोणाच्या मध्यस्थतातून सोडविण्याचा प्रयत्न करा. घरातील कोणत्यातरी व्यक्तीच्या लग्नाची तयारी कराल. विनाकारण कोणाबरोबर वाद घालू नका. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर वाद -विवाद भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोणाला भेटताना दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर येऊ नका. निर्णय समजूतदारपणे करा. व्यवसायात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. राजकीय कामात सफलता मिळेल. तरूणांना जॉब संबंधी शुभ बातमी मिळेल. पण, यावेळी तुमच्या व्यावसायिक निर्णयांना गुप्त ठेवणं गरजेचं आहे.

लव फोकस – वैवाहिक जीवनात सुख. प्रेम प्रकरणामुळे तुमच्या करिअर मध्ये दुर्लक्ष करू नका.

खबरदारी – प्रकृती बाबत सावधान आणि सतर्क राहणं गरजेचं आहे. नकारात्मक संगत आणि सवयीपासून दूर रहा.

शुभ रंग – गुलाबी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

कन्या –

व्यस्त दिनचर्या असेल. वैयक्तिक कामासाठी वेळ मिळणार नाही. नाते घट्ट होण्यासाठी तुमचा अहंकार सोडावा लागेल. यामुळे नात्यात गोडवा येईल आणि करिअरशी संबंधित कोणतीही चिंताही दूर होईल.

कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा, तो त्रासदायक असू शकतो. वादावादीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने वातावरणही नकारात्मक होऊ शकते. पण परस्पर समंजसपणानेही समस्या सुटतील. काही मोठे खर्चही येऊ शकतात. व्यवसायात नवीन यश तुमची वाट पाहत आहे. काही विशेष योजनाही आखल्या जातील. मार्केटिंगशी संबंधित कामांनाही प्राधान्य द्या. नोकरीत किरकोळ समस्या राहतील. नोकरी किंवा व्यवसायात राग तुमचा शत्रू बनू शकतो हे लक्षात ठेवा.

लव फोकस – कौटूंबिक सुख शांतीच्या दृष्टीने वेळ उत्तम. प्रेमप्रकरणात गैरसमज होऊ देऊ नका.

खबरदारी – वाहनं सावकाश चालवा.

शुभ रंग – पिवळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 5

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें