तुमची बहिण ‘या’ राशीची असेल तर चुकूनही देऊ नका हे गिफ्ट, राशीनुसार द्या ‘या’ भेटवस्तू
रक्षाबंधाला आपल्या बहिणीला कोणते गिफ्ट द्यावे यासाठी प्रत्येकजण आता विचार करत आहेत. तुम्ही जे काही गिफ्ट देत असाल ते तुम्ही बहिणीच्या राशीनुसार दिले तर दोघांसाठी फार शुभ ठरणार आहे. जाणून घ्या.

रक्षाबंधनाच्या सणाला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट घेण्याचा विचार करत असतो. 19 ऑगस्टला रक्षाबंधन असून श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. राशीनुसार तुम्ही तुमच्या बहिणिसाठी गिफ्टे दिले तर दोघांसाठी चांगलं ठरणार आहे. दोघांच्या नात्यातील गोडवा आणखी वाढेल, राशीनुसार आपल्या बहिणीला कोणते गिफ्ट द्यावे जाणून घ्या.
तुमची बहिणीची रास ही मेष असेल तर मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही बहिणीला लाल रंगाच्या वस्तू द्या. यामध्ये तुम्ही लाला रंगाचा ड्रेस, धातूच्या वस्तूंसह इलेक्ट्रानिक वस्तूही देऊ शकता. असे केल्याने दोघांसाठी हे शुभ ठरणार आहे. तुमच्या वृषभ राशीच्या बहिणींना पांढऱ्या रंगाच्या वस्तू भेट द्या. रेशमी कापड, मोत्याचे दागिने, संगमरवरी मूर्ती, अत्तराचा यामध्ये समावेश आहे. या सर्व गोष्टी शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत आणि असे केल्याने कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती आर्थिक लाभासोबत मजबूत होते.
तुमच्या बहिणीची रास ही सिंह असेल तर या राशीचा स्वामी सूर्य ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुले रक्षाबंधानाच्या दिवशी सोन्याचे दागिने, मौल्यवान रत्ने, तांबे भेटवस्तू द्याव्यात. तुमची बहिण ‘या’ राशीची असेल तर चुकूनही देऊ नका हे गिफ्ट, राशीनुसार गणेशाची मूर्ती, हिरवे वस्त्र, सोने चांदीचे दागिने इत्यादी भेटवस्तू भेटवस्तू देऊ शकता.
जर तूळ रास असेल तर बहिणीला जसे की पांढरा किंवा रेशमी पोशाख, मोत्याचा हार, कार, लाकडापासून बनवलेल्या वस्त आणि चांदीचे दागिने मिळू शकतात. जर तुमची बहीण वृश्चिक राशीची असेल तर वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे, त्यामुळे भावा, रक्षाबंधनाच्या दिवशी वृश्चिक राशीच्या बहिणींना लाल रंगाच्या वस्तू द्या, जसे की लाल मिठाई, सोन्याचे दागिने, तांब्यापासून बनवलेल्या चमकदार वस्तू, हातातील बांगड्या भेट देऊ शकता.
जर तुमच्या बहिणीची रास धनु असेल तर धनु राशीचा स्वामी गुरु ग्रहाचा प्रभाव आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी आपल्या धनु राशीच्या बहिणींना पुस्तके, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, पिवळे कपडे, भगव्या रंगाच्या मिठाई, फोन, शेअर्स इत्यादी भेट द्याव्यात. असे केल्याने भावा-बहिणीच्या जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळेल.
